लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
- बिएसएनएल सेवा त्वरित सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडु श्री नारायणh.b हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांची मागणी
कोरपना तालुका हा आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो येथील दुय्यम निबंधक रजिस्टर ऑफिस मध्ये मंगळवार 24 : 8 : 2021पासून 27 : 8 : 2021 पर्यंत गायब असल्यामुळे अनेक नागरिकांचे वेळेवर काम होत नसल्यामुळे व शेतीचा हंगामात असल्यामुळे शेतकरी व्यस्त आहे अनेकांना हा त्रास सहन करावा लागत आहे तसेच हप्त्यातून दोनच दिवस रजिस्ट्री चे काम केले जाते मंगळवार व शुक्रवारला कोरपना येथे रजिस्ट्रीचे काम केले जाते परंतु नेमके त्याच दिवशी लिंक राहातं नाही या मुळे नागरिकांचे हाल होत आहे त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक ताण सोसावा लागत आहे कोरपना येथील बि एस यन यल ऑफिसमध्ये एकही कर्मचारी राहत नाही कर्मचाऱ्यांना फोन लावला असता कोणीही कर्मचारी फोन उचलण्यास तयार नाही तसेच राजुरा येथील कर्मचार्यानां फोन लावला असता कोणीही फोन उचलण्यास तयार नाही लींक गायब राहाणे हे नेहमीचेच झालेले आहे तरी योग्य चौकशी करून बी एस एन एल सेवा चालू करून देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे तसेच भाजप पदाधिकारी श्री संजय तुकाराम चौधरी माजी उपसरपंच, श्री अनिल कौरासे शाखाध्यक्ष कोरपणा,श्री देविदास गौरकर, श्री राजु लटारी येरेकार, श्री दिवाकर दादाजी गडाम, श्री शेख महंमद शेख सदृद्दिन, श्री कैलाश गेडाम आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते