लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
🔶*500 कोटी रू. निधी वितरीत , एका आठवड्यात शेतकऱ्यांना रक्कम मिळणार : अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांची माहिती*
🔶*भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन*
चंद्रपूर , गडचिरोली , भंडारा , गोंदिया या चार जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धानाच्या खरेदी पोटी रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत . सदर रक्कम त्वरित देण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्याशी चर्चा केली. सदर रक्कमेच्या प्रदाना साठी 500 कोटी रू. निधी वितरित करण्यात आला असून एका आठवड्यात शेतकऱ्यांना रकम उपलब्ध करण्यात येईल असे आश्वासन सचीवांनी दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या यशस्वी पुढाकाराबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
उन्हाळी धानाची शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून विक्री केली मात्र अद्याप शेतकऱ्यांना संबंधित रक्कम न मिळाली नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. आधीच नैसर्गिक संकटांमुळे अर्थिकदृषट्या हवालदील झालेल्या धान उत्पादक शेतकरी वर्गाचे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.त्यामुळे उन्हाळी धानाचे पैसे शेतकऱ्यांना त्वरित देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सचिवांशी चर्चा केली . या संदर्भात मुख्यमंत्री , अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी देखील आ. मुनगंटीवार यांनी चर्चा केली. आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा महत्वाचा प्रश्न निकाली निघाल्याने देवराव भोंगळे यांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे .