लोकदर्शन 👉 मोहन भारती
🔶विहिरगाववाशीयांची खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे मागणी.
राजुरा :– ग्रामपंचायत विहिरंगाव तीन हजार लोकसंख्या असलेले मोठे गाव आहे. या परिसरात जवळ पास ८ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये सिंधी, नलफडी, चनाखा, सातरी, कोहपरा, पंचाळा, मुर्ती इत्यादी गावाचा केंद्र बिंदू विहिरंगाव आहे. आणि विहिरगावला बाजारपेठ निर्माण झालेली आहे. येथे महिला बचत गट मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत त्यांनाही मोठी दमछाक करावी लागते. या अगोदर बैंक ऑफ इंडिया शाखा विहिगाव हे विहिरगाव १९९८ पासून येथे होते पण काही कारणांमुळे चुनाळा येथे स्थलांतरित करण्यात आली. यामुळे या क्षेत्रातील लोकांना बँकेच्या व्यवहारासाठी 10 किमी अंतर प्रवास करून बँकेचे व्यवहार करावे लागत आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे चुनाळा येथील बैंक ऑफ इंडिया शाखा पून्हा विहिरगांव येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी विहिरगाववाशीय नागरिकांनी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी विहिरगावचे सरपंच रामभाऊ देवईकर, चनाखाचे उपसरपंच विकास देवाळकर, सातरीचे माजी सरपंच मारोती मोरे, पंचाळा चे उपसरपंच आकेश चोथले, इर्शाद शेख, रविकांत होरे यासह गावकरी उपस्थित होते.