लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा न. प. च्या २.५० लाख रुपये निधीतून बैडमिंटन कोर्टचे नूतनीकरण.
राजुरा :– उत्तम आरोग्य हिच खरी संपत्ती आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. त्यासाठी खेळ हे सशक्त मध्यम आहे. स्व. रामचंद्रराव धोटे स्मृती बैडमिंटन कोर्ट आता सुसज्ज असून यामुळे येथे नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंचे आरोग्य उत्तम राहील व यामधूनच दर्जेदार खेळाडू निर्माण होतील असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले ते राजुरा नगर परिषदेच्या २.५० लाख रुपये निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या रामचंद्रराव धोटे स्मृती बैडमिंटन कोर्ट च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
राजुरा नगर परिषदेच्या निधीतून नुकतीच या बॅडमिंटन कोर्टाचे मॅटिंगचे काम पूर्ण करण्यात आले. राजुरा नगर परिषद च्या वतीने येथे जीमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर एयरफिल्टर व स्वच्छतागृहाला आधुनिक रुप देणे व उर्वरित कामाकरिता आमदार सुभाष धोटे १० लाख रुपयाचा निधी देणार असल्याचे आश्वासन सुध्दा त्यांनी या प्रसंगी दिले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते रामचंद्रराव धोटे स्मृती बैडमिंटन कोर्टचे उदघाटन पार पडले. विशेष म्हणजे येथे राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, राजकीय पुढारी, व्यापारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, विद्यार्थी नियमित सराव करीत असतात.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, न प बांधकाम सभापती हरजीत सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता न प राजुरा चे कार्यालयीन अधीक्षक विजय जांभुळकर, इंजिनिअर रवी जामुनकर, फ्रेंड्स स्पोर्टींग क्लबचे सदस्य पी.यु. बोंडे, रवी जामुनकर, संदीप जैन, हरभजनसिंग भट्टी, प्रशांत गोठी, शंकर झंवर, गणेश रेकलवार, बद्री चन्ने, राकेश नामेवार, डॉ. अशोक जाधव, डॉ. राज कतवारे यासह अनेकांनी परिश्रम घेतले.