लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर:- भारतीय स्वातंत्रय दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृह परीसरातील क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या शहीदस्थळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण प्रसंगी जिल्हा क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके स्मारक समिती चे अध्यक्ष दयालाल कन्नाके, भाजयुमो चे प्रदेशाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा चे महानगर अध्यक्ष धनराज कोवे, विलास मसराम, एकनाथ कन्नाके, देव कन्नाके, भैयाजी उईके, भाजपा महानगर गटनेते वसंता देशमुख, माजी उमहापौर अनिल फुलझेले, भाजपा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, महानगर झोन क्र. 02 च्या सभापती खुशबु चैधरी, नगरसेवक मायाताई उईके, शितल आत्राम, शितल कुळमेथे, ज्योतीताई गेडाम, अनुराधा हजारे, आशाताई आबोजवार, शितल गुरनुले, वंदना तिखे, पुष्पाताई उराडे, मोहन चैधरी, सतिष घोडमारे, बाळू कोतपल्लीवार, अरविंद मडावी, गुरुदेव मोकासे, विठ्ठलराव कुमरे, कोमल राजगडकर, गणेश गेडाम, राजेंद्र तिवारी, पूनम तिवारी, गौतम यादव, तुषार मोहुर्ले, विकास खटी, राहूल बोरकर, स्वप्नील मून, प्रविण चुनारकर, कृपेश बडकेलवार, जगदिश दंडेले आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी हंसराज अहीर यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत *भारतीयांना* *मिळालेले हे स्वातंत्र्य* *मातृभुमिच्या अनेक सुपुत्रांच्या* *बलीदान व त्यागातून मिळाले आहे.* *म. गांधी यांनी शांततेच्या मार्गाने तर* *’’रणाविना स्वातंत्र्य कुणा मिळाले’*’ *या वीर सावरकर यांच्या वाक्याची* *आठवण करुन देत स्वातंत्र्यवीर सावरकर*, *आझाद हिन्द* *सेनेचे* *सुभाषचंद्र बोस या स्वातंत्र्यवीरांच्या* *सशस्त्र क्रांतीने, बलिदानाने* *देशाला स्वातंत्र्य मिळाले* असल्याचे अहीर यावेळी म्हणाले.
आज आपण ज्या पवित्र स्मारक स्थळी भारतीय तिरंग्याचे रोहण केले आहे त्या वीर बाबुरावजी शेडमाकेंच्या स्वातंत्र्य संग्रामातील शौर्याचा इतिहास आपणा सर्वांच्या हृद्यामध्ये कायम जतन झालेला आहे. आजच्या या पवित्र दिनी सर्व स्वातंत्र्ययोध्द्यांना नमन करून अमृत महोत्सवी स्वातंत्र्य सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देतो. यानंतर मान्यवरांचे हस्ते शाळकरी विद्यार्थ्यांना नोटबुक चे वाटप करण्यात आले.
*बिनबा गेट येथेही ध्वजारोहण*
सदर ध्वजारोहण कार्यक्रमानंतर हंसराज अहीर यांनी ऐतिहासीक बिनबा गेट येथील ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी महापौर अंजली घोटेकर, उमाताई खोलापूरे, राजू येले, रेणूताई घोडेस्वार, निलेश खोलापूरे, सचिन सातपूते आदि उपस्थित होते. यावेळी हंसराज अहीर व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते शाळकरी विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात आले.