* स्वातंत्र्यदिनी स्वतःच करणार डोंगरातून रस्ता
* घोडणकप्पी गाव विकासापासून वंचित
By : Shankar Tadas
जिवती:-आदिवासी कोलाम बांधवाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवितात माञ प्रत्यक्ष त्या योजनांच लाभ त्या लाभार्थांना मिळतो काय हे तपासण्याचे यंञ शासन प्रशासनाला तयार न करता आल्याने आजही अनेक गावात विकासाची किरणे पोहोचली नाही असाच प्रकार भारी ग्रामपंचायतमधील घोडणकप्पी गावात असून स्वातंञ्याच्या अनेक वर्षानंतरही शासन प्रशासन या वस्तीकडे फिरकले नाही.येत्या स्वातंत्र्य दिनी येथिल आदिवासी बांधव एकत्र येत श्रमदानातून रस्ता खोदणार असून हि शासन प्रशासनाला लाजीरवाणी बाब आहे.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर डोंगराच्या कपारीत वसलेल्या घोडणकप्पी गाव.संपूर्ण दारिद्रय रेषेखाली जगणारी 25 घरांची वस्ती,शासन प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावात शासनाच्या कुठल्याच योजना पोहोचल्या नाहीत.रस्ता नाही,…पाण्याची सोय नाही,आरोग्याची व पिण्याच्या पाण्याची सोय जवळपास नाही,पिण्याच्या पाण्यासाठी नाला पार करित पाणी आणावे लागते हि व्यथा आहे जोपडीत जीवन जगणाऱ्या घोंडणकप्पीतील आदिवासी बांधवाची.स्वातंञ्याचे ७४ वर्षे निघून गेली,माञ आदिवासी बांधवांना हक्काचं घरकुल मिळाल नाही,शौचालय नाही.पिढ्यानं पिढीपासून जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांची दैना माञ थांबलेली नाही.घोडणकप्पीतील आदिवासी बांधवाच्या वस्तीचे दृश्य पाहून जिवती तालुक्यात आजही असे जीवन जगणारे लोक असल्याचे आश्चर्य वाटते. डोंगराच्या कपारीत वसलेल्या घोंडणकप्पी गावाला जंगलांनी वेडले आहे.निसर्गाने नटलेल गाव पाहण्यासाठी सुंदर वाटत असले तरी जंगलाच्या शेजारी वस्तीत राहन म्हणजे जिवंतपणी नरकयातना भोगल्यासारखे होय.केवळ मतदानासाठीच या लोंकाचा वापर करण्यासाठी त्यांना विविध आश्वासन दिली जाते अन् आदिवासी बांधव या आश्वासनला बळी ठरतो मतदान करता करता अनेकांच आयुष्य संपून गेल माञ दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी कुठल्याच राजकिय नेत्यांना जाग आली नाही.ज्या सुखसुविधा समृध्दता शहरामध्ये आहे.प्रत्येक सोयी-सुविधांसाठी खेड्यातला माणूस पाञ असताना स्वातंञ्यानंतरही खेड्यातल्या माणसाला निरोगी जीवन सुख समृद्धी जीवनाची गुरूकिल्ली देवू शकली नाही.या निर्लज्य व्यवस्थेला कंटाळून कोलाम विकास फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली स्वातंञ्याचा तिरंगा फडकावित पहाड खोदून आपल्या गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारी वाट तयार करणार आहेत.