By : Mohan Bharti
गडचांदूर : मुरली दालमिया सिमेंटच्या वतीने,सामाजिक बांधिलकी स्वीकारत कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी 50 हजार सिरिन्ज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,यांच्याकडे सुपूर्द केल्या, याप्रसंगी मुरली सिमेंट चे वरिष्ठ महाप्रबंधक सुनील भुसारी,वरिष्ठ प्रबंधक हरगोविंद सिंह मीना,जिल्हा खनिज अधिकारी सुरेश नैताम,जिल्हा उपआरोग्य अधिकारी संदीप गेडाम,अरविंद ठाकूर उपस्थित होते. मुरली सिमेंटचे जिल्हाधिकारी अजय गुल्ह्याने,तथा आरोग्य अधिकारी यांनी आभार मानले आहेत.