लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
गडचांदुर शहरातील विदर्भ महाविद्यालयाच्या पटांगणावर अर्थ फाउंडेशन द्वाराआयोजित विविध संघटनांच्या मदतीने 28 जुलै ला गडचांदुर शहराच्या प्रथम नागरीक नगराध्यक्षा, सौ.सविताताई टेकाम यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पाडला.
या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समिति चे तालुका अध्यक्ष गेडाम आड़े संजय सेलोकर , चौधरी , टेकाम , गोवारदिपे , राठोड ,अर्थ चे पर्यावरण दूत अंकित मार्गोनवार , हेमंत भोयर , आशीष आणि इतर शिक्षक वृन्द आणि विद्यार्थी उपस्थित होते . वृक्षारोपण केलेल्या या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी प्रत्येकाला देण्यात आली हे विशेष !
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त नगराध्यक्षा टेकाम मॅडम नी उपस्थितांना मार्गदर्षन केले तसेच वृक्षरोपणाचे महत्वही विशद केले. सोबतच गडचांदुर शहरात विविध ठिकाणी वृक्षरोपणाचा मानस त्यांनी दाखविला. या प्रसंगी पटांगणात व्यायाम, तसेच इतर शारीरिक शिक्षण अभ्यास करणार्या विद्यार्थाना पावसामुळे त्रास होवु नये यासाठी पटांणाच्या किरकोळ डागडुजीसाठी नागरिकांनी स्वयंप्ररेणेने मदत करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आयोजक अर्थ फाउंडेशन चे संचालक डाॅ. कुलभूषण मोरे यांनी मिशन ग्रीन अर्थ अभियान बद्दल माहिती दिली. या अंतर्गत गडचांदुर शहर तथा कोरपना जीवति तालुक्यात वृक्षारोपण अभियान राबवत असल्याचे सांगितले . या अभियाना करीता डॉक्टर्स एसोसिएशन ता कोरपना , शिक्षक संघटना ता कोरपना व ता जीवति तसेच , व्यापारी एसोसिएशन , आणि निसर्गप्रेमी सामजिक कार्यकर्ते , ग्राउंड करत असलेले खेळाडू तथा विद्यार्थी यांचा या अभियाना करीता सहकार्य आणि सहभाग लाभला , जागतिक पर्यावरण दिना निमित्य हे अभियान सुरु करण्यात आले होते ..आता दुसऱ्या टप्प्या मधे वृक्षारोपण करण्यात आले . पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स एसोसिएशन तथा व्यापारी एसोसिएशन ने सहभाग घेतला होता..तर दुसर्या टप्प्यात शिक्षक संघटना आणि विद्यार्थानी सहकार्य आणि सहभाग घेतला तसेच सर्व पर्यावरण प्रेमी नि या मधे सहभाग घ्यावा असे आव्हाहन डॉ मोरे यानी केले आहे . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. संजय सेलोकर यांनी केले.
,