लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी मिळालेल्या निधीमुळे होतो आहे विकास*
*दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरात भूमीपूजन व लोकार्पण समारोह संपन्न*
जनतेच्या आशिर्वादाने सहा वेळा आमदार म्हणून व दोन वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे यापुढेही जनतेची सेवा करण्यात आयुष्य खर्ची व्हावे असे भावपूर्ण उद्गार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दुर्गापूर, ऊर्जानगर परिसरातील अनेक भूमीपूजन व लोकार्पण समारोहप्रसंगी काढले.
दुर्गापूर परिसरातील आयुषनगर येथे खुल्या जागेच्या सौंदर्यीकरणाचे ३० लक्ष रू. किंमतीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये संरक्षक भिंत, वाकींग ट्रॅक, वृक्षारोपण, ओपन जीम अशा अनेक गोष्टी तयार होणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्या वनिता आसुटकर, चंद्रपूर पंचायत समिती सभापती केमा रायपुरे, गौतम निमगडे, तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, शांताराम चौखे, देवानंद थोरात यांची उपस्थिती होती. जनार्धन पंधरे, शास्त्रकार, अरूण आकोटकर, मोटघरे सर, देवेष गौतम, संजय गिलबिले यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले. या सर्वांचा सत्कार आ. मुनगंटीवार यांनी केला. याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी होणा-या कामाच्या गुणवत्तेवर परिसरातील नागरिकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले.
त्यानंतर दुर्गापूर येथे श्री. शेंडे ते श्री. बदखल यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे २२ लक्ष रू. किंमतीच्या कामाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी श्री. बदखल यांच्या घरापासून पूढील रस्त्याच्या नविन कामाचे अंदाजपत्रक बनविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.
दुर्गापूर येथे वार्ड नं. १ येथे दोन रस्त्यांचे २५ लक्ष रू. किंमतीचे भूमीपूजन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी काऊबाई चुनारकर, प्रभाताई घोटेकर, नंदूभाऊ झाडे, मालाताई नळे, विलास मानकर यांच्या हस्ते हे भूमीपूजन संपन्न झाले.
दुर्गापूर वार्ड नं. ३ येथे वाढीव विद्युत पोल्स व ट्रान्सफॉर्मर यांचे ९८ लक्ष रू. किंमतीचे लोकार्पण झाले. २३ लक्ष रू. किंमतीच्या रस्त्याचे व पेव्हींग ब्लॉकचे भूमीपूजन सुध्दा याप्रसंगी संपन्न झाले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, दुर्गापूर परिसरात लष्करे कुटूंबामध्ये झालेले अपघाती मृत्यु हे अतिशय दुर्देवी आहेत. ‘गरीबो के दिल जितना यहीं हमारा लक्ष होना चाहीए’ या वार्डातील समस्यांसाठी १० ऑगस्ट नंतर सर्व संबंधित विभागाच्या अधिका-यांची बैठक याठिकाणी आयोजित करू असे आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले. आपल्याला कुठलीही मदत केव्हाही लागली तरी मला आवाज द्या असे भावनिक आवाहन याप्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी केले. याप्रसंगी रामपाल सिंह, जि.प. महिला व बालकल्याण सभापती रोशनी खान, पंचायत समिती सदस्य संजय यादव, माजी सरपंच श्रीनिवास जंगमवार, सरपंच पुजा मानकर, सुनिल बरियेकर, मुबारक शेख, महेंद्र लांबट, महेंद्र रहांगडाले, प्रशांत कोपुला यांची उपस्थिती होती.