*
लोकदर्शन 👉 मोहन भारती
_*अकोला/लातूर* : गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर मिळत असून मंगळवारी (ता.२७) ऐतिहासिक १० हजाराच टप्पा गाठला. वाशीम बाजार समितीत १०० क्विंटल सोयाबीनला १० हजार रुपये, तर लातूर बाजार समितीत ९ हजार ८५१ रुपये कमाल दर मिळाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेंडीची मागणी, वायदे बाजारात होणारे व्यवहार, त्यात कमी असलेली आवक यामुळे सोयाबीन तेजीत आहे. वाशीम बाजार समितीत गेल्या काही महिन्यांत सोयाबीन सात हजारांवर विकली जात आहे. आता हा दर पुन्हा वाढून दहा हजारांपर्यंत पोचला सोयाबीनला किमान दर ८ हजारांपासून दर मिळाला. दर्जेदार सोयाबीनची यंदा बियाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी खरेदी केली होती. मंगळवारी सुमारे १४०० क्विंटलची आवक झाली होती. पहिल्यांदाच दहा हजारांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. शेतकऱ्यांकडील बहुतांश सोयाबीन विक्री झालेले आहे. सध्या आवक होत असलेला माल हा साठवून ठेवलेल्यापैकी असल्याचे सांगितले जाते._
_लातूर शहरातील तेल उत्पादक कंपन्यांनी दहा हजार रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली आहे. येथील आडत बाजारात आक्टोबरमध्ये सोयाबीनला कमाल भाव चार हजार १९० रुपये राहिला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्यात त्यात सातत्याने वाढ होत गेली फेब्रुवारीमध्ये पाच हजाराचा टप्पा पार झाला. मार्चमध्ये सहा हजारापर्यंत सोयाबीन गेले. एप्रिलपासून सोयाबीनच्या भावात कधीच मंदी आली नाही. साडे सात हजार, आठ हजार असे भाव वाढत गेला २३ जुलै रोजी सौद्यात आठ हजार ९५१ रुपये कमाल भाव राहिला आहे. सरासरी भाव नऊ हजार सातशे रुपये राहिला आहे. तर शहरात तेल उत्पादक कंपन्यांनी दहा हजार रुपये प्रति क्विंटलला भाव दिला आहे._
*_शेतीमाल बाजार अभ्यासक दिनेश सोमाणी म्हणाले_*
_सोयाबीन पीक कमी होते आणि खाद्यतेलाच्या वाढत्या दराने सोयाबीन दराला आधार मिळाला. सोयाबीनचा साठा अत्यल्प उपलब्ध. बाजारातील घडामोडींमुळे सोयाबीन १० हजारांवर पोहोचले आहे. एनसीडीईएक्ससी संलग्न वेअरहाउसेसमध्ये साठा नाही आणि ज्यांनी ऑगस्ट कॉन्ट्रॅक्ट विकले आणि डिलिव्हरी देण्यात असमर्थ ठरल्यास मागील तीन दिवसांच्या हजर दरावर तीन ते चार टक्के दंड द्यावा लागणार आहे. म्हणजेच जर हजर दर १० हजार रुपये असतील तर डिलिव्हरी देण्यात असमर्थ ठरल्यास १० हजार ३०० रुपये द्यावे लागतील. सीबॉटवर सोयाबीन १३६६ डॉलरवर आहे आणि सोयातेल ६३.५० डॉलरवर आहे._
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*