, लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,⭕इबादुल सिद्दीकी यांची मागणी
चंद्रपूर,,
चंद्रपूर जिल्हा प्रदूषण ग्रस्त व वीज निर्मिती करून बाहेर वीज पाठीवणारा असून महावितरण कंपनी तर्फे ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या बिलामध्ये प्रचंड वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहेत, यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसला आहे,
लाकडाऊन झाल्याने कित्येक लोकांचा रोजगार गेला असल्याने जीवन कसे जगावे,असा प्रश्न निर्माण झाला असतानाच दर महिन्याला येणाऱ्या विद्दुत बिलामध्ये होत असलेली प्रचंड वाढ बघून ग्राहक हैराण झाले आहे,वीज बिल मुदतीत भरले नाही तर वीज पुरवठा खंडित केला जाईल,या भीतीने ग्राहक बिल निमुटपणे भरत आहेत, हे अन्यायकारक आहेत,
सध्याच्या वीज बिलात 100 युनिट नंतर युनिट च्या मूल्यात वाढ होत असते,
चंद्रपूर जिल्हा प्रदूषण ग्रस्त व प्रचंड उष्णता असल्याने बहुतेक लोकांच्या घरी पंखे, कुलर,फ्रीज, यासारखे विद्दुत उपकरणे आहेत, त्या मुळे 100 युनिट पेक्षा अधिक युनिट खर्च होत आहेत, त्या मुळे वीज बिलात वाढ होत आहेत, तेव्हा वीज वितरण कंपनी ने 100 युनिट ची मर्यादा 200 युनिट पर्यंत वाढवून ग्राहकांना दिलासा द्यावा,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनात केली आहे,
,,,,,,
दिल्लीत वीज ग्राहकांना मोफ़त वीज मिळते, मग चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहकांना वीज मोफत नको पण सवलती दरामध्ये देण्यास काहीच हरकत नाही, वीज निर्मिती केंद्र असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना सवलती च्या दराने वीज पुरवठा करावा अशी मागणी निवेदनात सिद्दीकी यांनी केली आहे,
या प्रकरणी लोकप्रतिनिधी नि सुद्धा शासनाकडे पाठपुरावा करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा,अशी मागणी आहे,
,,फोटो,,