आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा.डॉ.शरद बेलोरकर यांना आऊट स्टँडिंग परफॉर्मन्स अवॉर्ड ( outstanding performance award 2021) जाहीर

लोकदर्शन   ÷ मोहन भारती
गडचांदूर:-
*नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड* (Govt.of UK)आणि *चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन* संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरदराव पवार महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.शरद बेलोरकर यांना आंतरराष्ट्रीय आऊट स्टँडिंग परफॉर्मन्स अवॉर्ड पुरस्कार जाहीर झाला असून प्रमाणपत्र,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.इंग्लंड व भारतातील सदस्य असलेल्या गठीत समितीद्वारे त्यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजकांकडून विविध आतंरराष्ट्रीय पुरस्‍कारासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले होते.यामध्ये देशभरातून 109 प्रस्ताव आलेले होते. त्यापैकी 28पात्र प्रस्तावाची निवड करण्यात आलेली होती. परिषदेमध्ये पात्र प्रस्तावांना विविध गटात पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. प्रा.डॉ.शरद बेलोरकर हे 15 वर्षांपासून रासेयो चे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहे त्यांचे महाविद्यालयाच्या कार्यात,विविध उपक्रमात,तसेच राष्ट्रीय सेवा योजना, प्रौढ शिक्षण, गुणवत्ता हमी कक्ष(IQAC) तथा माजी विध्यार्थी, पालक समिती या सर्व समित्यांचे सदस्य असून त्यांनी 100 चे वर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त त्यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृस्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे.या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना आतंरराष्ट्रीय परिषदेमध्ये आऊट स्टँडिंग परफॉर्मन्स अवॉर्ड हा आतंरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *