By : Mohan Bharti
राजुरा :– नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड (Govt.of UK)आणि चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन संचालित चिंतामणी महाविद्यालय घुगूस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शरदराव पवार महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय गोरे यांना आतंरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स अवार्ड आणि बेस्ट टीचर ऑफ द ईयर अवार्ड हे दोन पुरस्कार जाहीर झालेले आहेत. प्रमाणपत्र, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इंग्लंड व भारतातील सदस्य असलेल्या गठीत समितीद्वारे त्यांची निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजकांकडून विविध आतंरराष्ट्रीय पुरस्कारासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले होते. यामध्ये देशभरातून 109 प्रस्ताव आलेले होते. त्यापैकी 27 पात्र प्रस्तावाची निवड करण्यात आलेली होती. परिषदेमध्ये पात्र प्रस्तावांना विविध गटात पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. प्रा. डॉ. संजय गोरे हे पीएचडी पदवीचे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 8 विद्यार्थ्यांना आचार्य पदवी (Ph.D.) प्राप्त झालेली आहे. 3 विद्यार्थ्यांचे संशोधन सुरू आहे त्यांचे आजपावेतो 6 क्रमिक आणि संदर्भ ग्रंथ तौलनिक शासन आणि राजनीती, तुलनात्मक शासन आणि राजकारण,भारतीय लोकशाही, पंचायतराज आणि आदिवासी नेतृत्व, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्था, चंद्रपूर जिल्यातील आदिवासी नेतृत्व प्रकाशित झालेले आहे. डॉ. गोरे हे नांदेड, नागपूर, जळगाव, अमरावती विद्यापीठाचे आचार्य पदवी बहिस्थ पर्यवेक्षक आहेत. त्यांनी 3 लघु शोध प्रकल्पाला को-इव्हेस्टर म्हणून योगदान दिलेले आहे. त्यांचे 45 संशोधन पर लेख विविध पियर रिव्हिव व युजिसी लिस्टयेड जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहे. या सर्व संशोधन कार्याची दखल घेऊन त्यांना आतंरराष्ट्रीय रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झालेला आहे. तसेच त्यांचे विस्तार कार्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, प्रौढ शिक्षण, पर्यावरण यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांना या आधी गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कार आणि गोंडवाना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची निकटचा संबंध असून महाविद्यालय स्तरावर त्यांचे भरीव कार्य आहे. तसेच ते गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) चे समन्वयक आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. गोरे यांना बेस्ट टीचर ऑफ द इयर अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. एकाच वेळेस त्यांना दोन अवार्ड जाहीर झालेले असून डॉ.गोरे यांनी आयोजक नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लंड आणि चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाचे आभार मानले आहे. यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.