लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕दोषींवर कठोर कारवाई करावी
सखी महिला बचत गट कन्हाळगाव ची मागणी
कोरपना तालुका हा आदिवासी दलीत शोशीत पीडीत म्हणुन ओळखला जातो कन्हाळगाव येथील सखी महिला बचत गट आहे यावर्षी नवीन कर्ज घेण्याकरिता मागील वर्षीचे दोन लाख रुपये सचिवाकडे दिले व तिने लोणचे पैसे बँकेत भरणा केले असे सांगितले तसेच नवीन लोन घेण्यासाठी नवीन फाईल उघडावी लागेल असे बँकेच्या सचिव सौ प्रतिभा मंगल बावणे यांनी फाईल तयार केली म्हनुन फाईलवर व विड्रालवर सह्या घेतल्या तुम्हाला पैसे मिळणार आहे म्हणून सांगितले व बचत गटाकडून तेराशे रुपये नगदी स्वरूपात घेतले व तुमचे पैसे मिळाले तुम्ही वाटून घ्या असे सांगितले आम्ही सचिवाकडे गेलो असता आज वाटतो उद्या वाटू असे बनवाबनवीचे उत्तरे मिळत होती व सौ मनीषा निखिल उईके आम्हाला रोज सांगत होती आठ ते दहा दिवसांचा कालावधी संपला आम्हाला संशय आल्यामुळे आम्ही बँक मॅनेजर साहेबांसी संपर्क साधला असता मॅनेजर साहेबांनी सांगितले तुमच्या मागील वर्षाच्या लोणचे पैसे दोन लाख रुपये भरलेली नसून तुम्हाला नवीन लोन कसे काय मिळणार असे सांगितल्यानंतर त्या महिलांच्या पायाखालची वाळू घसरली व आपण फसविल्या गेलो असे लक्षात आले आम्ही बँक मॅनेजर तहसीलदार साहेब ठाणेदार साहेब यांना निवेदनाद योग्य चौकशी करून आम्हाला आमचे पैसे मिळवून द्यावे तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सौ अनिता संजय केराम अध्यक्षा,सौ शिल्पा गजानन वाघाडे सदस्य,सौ संगीता संदीप वाघाडे सदस्य,सौ मेघा विजय वाघाडे सदस्य,श्रीमती शारदा विश्वनाथ हंसकर सदस्य,सौ माया रमेश खंडाळकर सदस्य,सौ रंजना राजू वाघाडे सदस्य,सौ विमलबाई रामदास मडावी सदस्य,सौ मंगला मनोर पार्खी सदस्य यांनी तहसीलदार ठाणेदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे जर पैसे न मिळाल्यास आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरणार नाही अशी विनंती केली