भारतीय जनता पार्टी कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती साजरी

एक संघ भारताचे स्वप्न पाहणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी – देवराव भोंगळे

डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार आत्मविश्वास वाढविणारे- डॉ.मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा व महानगर तर्फे डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 120 व्या जयंती निमित्य, त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी देवराव भोंगळे म्हणाले, जनसंघाचे प्रमुख डॉ. श्यामाप्रसाद मूखर्जी यांनी एक संघ भारताचे स्वप्न पाहिले. कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत एक भारत असण्याचे स्वप्न पाहून ते पुर्ण करण्‍यासाठी आपल्‍या जीवनाचे बलिदान सुध्‍दा दिले आहे. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्‍या पुण्‍यतिथी दिनापासून २३ जुन ते ६ जुलै जयंती दिनापर्यंत विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. ज्‍यामध्‍ये बलिदान व्‍याख्‍यान, रक्‍तदान शिबीर या सारख्‍या अनेक कार्यक्रमांचा समावेश होता.

महानगराध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे या प्रसंगी म्‍हणाले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार आत्‍मविश्‍वास वाढविणारे असुन त्‍यांनी एक देश मे दो प्रधान, दो निशान, दो विधान नही चलेंगे असा नारा देवुन प्रत्‍येक भारतीय नागरिकांच्‍या मनात आपले स्‍थान निर्माण केले आहे.

सदर कार्यक्रम ६ जुलै रोजी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर येथे घेण्‍यात आला. या जयंती कार्यक्रमाला महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, महानगर महिला मोर्चा अध्‍यक्षा सौ. अंजली घोटेकर, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्‍वलंत कडू, भाजपा महानगर उपाध्‍यक्ष सुरज पेदुलवार, मंडळ अध्‍यक्ष सचिन कोतपल्‍लीवर, रवी लोणकर, मंडळ महामंत्री संजय निखारे, सत्‍यम गाणार, राहुल पाल यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *