, लोकदर्शन 👉मोहन भारती
⭕चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन,
⭕पुनर्विचाराची अपेक्षा…….
मुंबई : करोनाच्या सद्य:स्थितीत मोर्चे, आंदोलने, उद्घाटन समारंभ या माध्यमातून राज्यकर्तेच शेकडोंची गर्दी जमवताना दिसत आहेत,
मग गणेशोत्सवावर निर्बंध कशासाठी ?,
असा सवाल मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केला आहे.
राज्य सरकारच्या गृहविभागाने गणेशोत्सवाची नियमावली जाहीर केली असून त्यात गेल्या वर्षीचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.
यामध्ये मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी घालण्यात आलेल्या ४ फुटांच्या र्निबधाला प्रखर विरोध होत आहे.
मंडळांसह, मूर्तिकार, गणेशोत्सव समिती सर्वानी एकमताने सरकारला नियमांचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
‘राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटात गणेशोत्सव मंडळांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
गेल्या वर्षीही मंडळांनी मोठय़ा प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले,
अर्थसाहाय्य केले आणि परिस्थितीचे भान बाळगून उत्सवही साधेपणाने केला. यंदाही आम्ही नियम पाळायला तयार होतो,
फक्त गणेशमूर्तीच्या उंचीची अट आम्हाला मान्य नाही.
सरकारने मंडळांशी चर्चा करणे अपेक्षित होते.
तसे न झाल्याने आम्ही पुन्हा एकदा चर्चेची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत,
असे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले.
या संदर्भात लालबाग-परळ येथील गणेशोत्सव मंडळे एकत्र येऊन बैठक घेणार असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे समाजमाध्यमांवर मुंबईतील गणेश मंडळांनी निषेध व्यक्त केला आहे.
‘उत्सव नाही तर मतदान नाही,
माझा गणेशोत्सव माझी जबाबदारी’ यांसारखी घोषवाक्ये कार्यकर्ते दिवसभर प्रसारीत करत होते.
मूर्तिकार म्हणतात.. ‘सरकारच्या निर्णयाचा पूर्णत: निषेध आहे.