लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या मागणीला यश.
चंद्रपूर/ राजुरा :- -कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली विध्यार्थी व पालकांची आर्थिक आणि मानसिक कमकुवत परिस्थिती लक्षात घेता गोंडवाना यंग टीचर्स अससोसिएशन ने विद्यापीठाकडे कोरोना काळातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी आणि विविध शुल्क यामध्ये सरसकट माफी अथवा कपात करण्याची मागणी केली होती. या संघटनेच्या मागणीला यश प्राप्त झाले असून विध्यापीठाने विदयार्थ्यांच्या परिक्षा फी आणि विविध शुल्क यामध्ये मोठी कपात केली असून यासंदर्भात आज परिपत्रक निर्गमित केले आहे. यामुळे विध्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंडवाना विद्यापीठाने येत्या शैक्षणिक सत्र 21-22 करिता इंद्रधनुष्य, आव्हान, आविष्कार, विध्यार्थी कल्याण निधी, विधारथीसंघ शुल्क, वैधकीय तपासणी अर्ज शुल्क, आपत्ती वैवस्थापन शुल्क 100 टक्के माफ करण्यात आले आहे. प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क, आणि पर्यावरण शुल्क यामध्ये 50 टक्के कपात करण्यात आली असून उन्हाळी 2020 परिक्षेकरिता सर्व नियमित विध्यार्थ्यांकारीता फी मध्ये सरसकट 10 टक्के फी कपात करण्यात आली आहे. तर विध्यार्थ्यांना देय असलेल्या विविध फी आणि शुल्का मध्ये कपात केल्याने विध्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ने सातत्याने विध्यार्थी हित लक्षात घेऊन कोरोना काळातील विद्यार्थ्यांची फी माफी किंवा सवलत देण्याची मागणी केली होती. संघटनेच्या या मागणीला यश प्राप्त झाले असून विद्यापीठाने विविध सदराखाली विदयार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या फी आणि शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे .संघटनेच्या यशस्वी लढ्याबद्दल संघटनेचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. विदयार्थी हिताचा प्रश्न सोडविल्याबद्दल संघटनेने विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे.