लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केला मिसाबंदींचा सत्कार.
२५ जून १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली व सर्व प्रसार माध्यमे तथा वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य हिरावले. याचवेळी अनेक निष्पाप व्यक्तींना तुरूंगात डांबण्यात आले. यातील कित्येकांनी १९ महिनेपर्यंत तुरूंगवास भोगला व त्यामुळे त्यांच्या कुटूंबांना प्रचंड त्रास झाला. अशा आणीबाणीदिनाचा मी तिव्र शब्दात निषेध करतो व कॉंग्रेसच्या हूकूमशाही प्रवृत्तीचाही मी निषेध करतो.
यावेळी चंद्रपूरातीलही अनेकांना तुरूंगवास भोगावा लागला. त्यातीलच एक हनुमाननगर येथील रहिवासी सुधीर टिकेकर यांना सुध्दा दोन महिने तुरूंगवास भोगावा लागला. त्यांच्या या त्यागाची आठवण म्हणून लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्याघरी जावून शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सुधीर टिकेकर यांनी या छोटयाश्या त्यागाची आठवण ठेवून सत्कार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
चंद्रपूरातील आणखी काही जणांनी त्या काळात कारावास भोगला. त्या सगळयांच्या घरी जावून जिल्हा व महानगरातील पदाधिका-यांनी त्यांचा सत्कार केला. यामध्ये नंदूभाऊ वेखंडे, बंडूभाऊ पदलमवार, गिरीशजी अणे, अनिलराव अंदनकर, हेमंतराव डहाके, नानुजी पिंपळापूरे यांचा समावेश आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समितीचे सभापती रवि आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमोचे अध्यक्ष विशाल निंबाळकर, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, शिला चव्हाण, मांदाडेताई, जुमडेताई, गुरनुलेताई, डुकरेताई, सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, हेमंत गुहे, प्रमोद शास्त्रकार, रवि लोणकर, विठठलराव डुकरे, यश बांगडे, पुरूषोत्तम सहारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आजच झालेल्या संवाद सेतुमध्ये आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आणीबाणी कशी व का लावली याची कार्यकर्त्यांना माहिती दिली. यावेळी जिल्हयातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.