लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
भाजप कार्यालय कोरपना येथे आणीबाणीच्या विरोधात नारेबाजी करून निषेध करण्यात आला व काळा दिवस म्हणून पाळण्यात आला श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला सत्कार मूर्ती दिनकरराव लक्ष्मणराव बुराण प्रमुख पाहुणे श्री किशोरजी बावणे,शशिकांत अडकिने अमोल आसेकर,ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव,ॲड पवन मोहितकर,बालु पाणघाटे, सुधाकरजी मोडक,दुरडकर, नथ्थुजी लोडे,राजु लांडगे इतर मान्यवर उपस्थित होते तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी मिसा खाली अटक झालेल्या श्री दिनकरराव लक्ष्मण बुराण यांचा शाल,श्रीफळ,शील्ड व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी 1971 च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी व यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला व अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना दोषी ठरविले लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षासाठी बंदी घालण्यात आली 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली लोकशाही स्थगित करून भारताचे प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलल्या इंदिरा गांधी यांनी जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज
फर्नांडिस व इतर नेत्यांना अटक करण्यात आली श्रीमती इंदिरा गांधी यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आले यामध्ये अनेक निष्पाप लोकांची नस बंदी करण्यात आली न्यायालयाचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली व निवडणुका घेण्यात आल्या परंतु इंदिरा गांधी यांचा पराभव झाला व मोरारजी देसाई चे सरकार अस्तित्वात आले असे मत व्यक्त केले इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ओम पवर यांनी केले तर आभार श्री अमोल आसेकर यांनी मानले