— आमदार सुभाष धोटे.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपिपरी येथे भव्य महिला बचत गट व महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.
गोंडपिपरी :– २५ जून २०२१
गोंडपिपरी येथील खैरे कुणबी समाज सभागृह येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला काँग्रेस कमेटी च्या जिल्हाध्यक्षा सौ. चित्राताई डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तालुकास्तरीय महिला बचत गट व महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की जागतिक महासत्ता होण्यासाठी भारताला महिला सक्षमकरणाची नितांत गरज आहे. तसे पाहिले तर महिलांनी स्वतः स्वयंस्फूर्त आत्मनिर्भरतेने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गगणभरारी घेतली आहे. भारतीय संविधानाने स्त्रियांना अतिशय भक्कम कायदेशीर आधार दिला आहे. महिला सक्षमीकरण, महिलोन्नती मध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचे भरीव योगदान राहिले आहे. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या काळात 1990 मध्ये संसदेच्या एका अधिनियमाद्वारा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यांच्याच पुढाकाराने संविधानात 73 वें आणि 74 वें संशेाधन (1993 मध्ये) करण्यात आले. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागा लागू करण्यात आल्या. बँकांच्या माध्यमातून वित्तीय सहाय्यता देण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच महिला आज सामाजिक वनीकरण, डेयरी विकास, बागकाम, पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्य पालन, शिवणकाम, औद्योगिक प्रशिक्षण, हस्तकला प्रशिक्षण, छोटे व मध्यम गृहउद्योग आणि अशा नानाविध क्षेत्रात महिला बचत गटाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक रित्या उल्लेखनीय कार्य सहभाग व विस्तार करीत आहेत. त्यामुळे या भागातील सर्व महिला बचत गटांनी तसेच सर्व सामान्य महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा, संविधानिक अधिकारांचा लाभ मिळवून स्वतःचा आणि परिसरातील महिलांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी महिला काँग्रेसच्या जिल्हा सचिव नम्रता ठेमस्कर, गोंडपिपरी महिला काँग्रेस अध्यक्षा शीलाताई बांगरे, माजी सभापती हर्षाताई चांदेकर, कृ.उ.बा.स चे सभापती सुरेश चौधरी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, संभू येल्लेकर, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, गौतम झाडे, कमलेश नीमगडे, देविदास सातपुते, अभय शेंडे, रेखा रामटेके, दुर्गे, माजी नगरसेविका हुलके ताई, गेडाम ताई, महिला सरपंच रंजु खरबंटकर, मीनाक्षी खरबंटकर, उषा धुडसे, भाग्यश्री आदे, मनिषा निखाडे, निमगडे ताई, बंडावार ताई, गयाबाई, सांगाडे ताई, महिला बचत गटाच्या महिला, महिला काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होते.