जागतिक पर्यावरण दिन. च्या औचित्य निमित्त विदर्भ महाविद्यालय जीवतीच्या सांस्कृतिक विभाग , मराठी विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
निबंध स्पर्धेचा विषय – पर्यावरण आणि मानवी जीवन, आरोग्य, समाज, कोरोना होता. यात काही उत्कृष्ट निबंध प्रशंसनीय होते. तसेच स्पर्धा असल्याने क्रमांक देणे गरजेचे होते. स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली त्यात पहिला गट वरिष्ठ व दुसरा कनिष्ठ महाविद्यालयीन होता.
वरिष्ठ गटात
*1. सपना नागेश देवाले
2. वैष्णवी अण्णाराव शेळके
3. मयमुन रशीद शेख यांनी* क्रमांक पटकावला.
तर कनिष्ठ गटात
*1. महेक आतिख देशमुख
2. दिपक लक्ष्मण पुरी
3. महादेवी बालाजी वारे* .
यांनी पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. तसेच सहभागी स्पर्धकांचे सुद्धा अभिनंदन.यशस्वी स्पर्धकांचा महाविद्यालयातर्फे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजना करिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ एस. एच. शाक्य यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले तसेच
महाविद्यालयातील प्राध्यापक लांडगे, राऊत, तेलंग, देशमुख, पानघाटे, साबळे, मुंडे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा मोलाचे योगदान केलें व स्पर्धा यशस्वी केली