गडचांदुर मो.रफिक शेख
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्यावाहिल्या सिमेंट उद्योगातील गडचांदूर शहरात 1984 85 दरम्यान माणिकगड सिमेंट उद्योग समूहाची स्थापना झाली त्यावेळी गडचांदूर शहर ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली होते मात्र ग्रामपंचायतीला एक मस्त कर आकारणी करून सवलतीचा फायदा व कराची सूट कंपनी प्राप्त करीत असे गडचांदूर शहर हा औद्योगिक दृष्ट्या प्रगत वाढती लोकसंख्या पायाभूत मूलभूत आवश्यक गरजा नागरिकांच्या वाढल्याने पूर्वी कर आकारणीच्या दरामध्ये कंपनी फायदा घेत विकासावर परिणाम व आरोग्याला धोका निर्माण झाला ग्रामपंचायतीने चुकीचे कर पद्धती आकारून कोट्यवधी रुपयांचा फटका विकासावर बसला मात्र नव्याने ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून या ठिकाणी नगर परिषद स्थापन झाली नगर परिषदे नंतर आवश्यक गरजेची कामाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली शहराच्या प्रगतीबरोबर आवश्यक सुविधा पुरविणे अग्रक्रम प्राप्त आहे मात्र या शहराला लागून असलेल्या हाके च्या ओव्या वर माणिकगड सिमेंट म्हणजेच अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाचे वाहणारे घाण सांडपाणी वायू प्रदूषण ध्वनि प्रदूषण धूर डस्ट मुळे अख्या गावाचा आरोग्य धोक्यात असता आहे वाहणाऱ्या सांडपाणी दूषित असल्याने याचा परिणाम देखील शेती उपयोगी जनावरे दुधाळजनावर रे यांच्यावर दिसून येते गेल्या 35 वर्षापासून ज्या पद्धतीने वर कर वसुली केल्या जात आहे ही पद्धत चुकीची व शासनाच्या तिजोरीला चुना लावणारी व नागरिकांच्या गरजांना न भागणारी असल्यामुळे नगर परिषदेकडून मूल्यनिर्धारण अधिकाऱ्याची नेमणूक करून अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी च्या कर्मचारी निवासस्थान वाणिज्य की प्रकल्प इमारतीची मूल्यनिर्धारण कर आकारणी करून योग्य मूल्य किंवा भांडवली मूल्य नवीन कर निर्धारण सूची तयार करुन नव्याने कर आकारणी करण्यात यावी यामुळे कोट्यावधी रुपयांच्या होणारे नुकसान नगर परिषदेच्या तिजोरीत जमा होऊन नगर विकासाला गती देता येईल यापूर्वीची कर आकारणी रद्द करण्यात यावी नगर परिषद ने नव्याने मूल्यनिर्धारण कर आकारणी कारवाई करावी तसेच कंपनीचा घाण मल प्रवाह धूर धूळ यामुळे होणारे प्रदूषण व नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका यासाठी कंपनीने बंदिस्त गटारे द्वारे त्याच्या प्रवाहामध्ये सांडपाणी सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी नगर विकास मंत्री जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे