By : Mohan Bharti
चंद्रपूर:– विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी याकरिता गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने आज मा.उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या कडे मागणीचे निवेदन देण्यात आले असून यामध्ये खालील मागण्यांचा समावेश आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातील विद्यार्थ्यांची विद्यापीठाची उन्हाळी 2021 च्या परीक्षा फी मध्ये सवलत देण्यात यावी,बिगर नेट सेट प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी सकारात्मक तोडगा काढावा त्याचप्रमाणे,बिगरनेट-सेटप्राध्यापकांना त्याच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून CAS चे लाभ द्यावे व पेन्शन लागू करावी ,एम.फिल धारक प्राध्यापकांना पदोन्नती तसेच वेतनवाढीचा लाभ देण्यात यावा,सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदाच्या पदोन्नती करिता प्लेसमेंटची देय तारीख (Due date) ग्राह्य धरण्यात यावी, 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी,सहसंचालक (उच्च शिक्षण) यांचे कार्यालय गडचिरोली येथे स्थायी स्वरुपात स्थापन करण्यात यावी तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे अकॅडमिक स्टॉप कॉलेजची निर्मिती निर्मिती करून प्राध्यापकाच्या गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन द्यावे.अशा विविध महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन संघटनेचे मार्गदर्शक डॉ. प्रदीप घोरपडे व अध्यक्ष डॉ. संजय गोरे यांच्या मार्गदर्शना खाली संघटनेचे सचिव प्रा. डॉ. विवेक गोर्लावार, सहसचिव प्रा. डॉ. प्रमोद बोधने प्रा. डॉ. किशोर कुडे, प्रा. डॉ. राजू किरकिरे, प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी आज ना.उदय सामंत यांना दिले आहे.