लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕बिबी ग्रामपंचायतचा उपक्रम
७५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
कोरपना – तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ६५ आदिवासी बांधवांना भुमिहिन प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. बिबी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर यांनी पुढाकार घेऊन गावातील ६५ आदिवासी लोकांचे भुमिहिन प्रमाणपत्र काढून दिले.
यावेळी आमदार निधी, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे, वसंतराव नाईक तांडा वस्ती निधी, स्वच्छ भारत मिशन अशा विविध निधी अंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रवेशद्वारावरील पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बिबी येथील स्नेहा राजेंद्र काकडे हिने स्वतःच्या हाताने रेखाटलेली आमदार सुभाष धोटे व उपसरपंच आशिष देरकर यांची पेंटिंग भेट दिली. प्रा. शरद बेलोरकर यांच्या माध्यमातून शरद पवार महाविद्यालयाकडून ५०० मास्क आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ग्रामपंचायतकडे सुपूर्द करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे उपस्थित होते. यावेळी मंचावर सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच आशिष देरकर, जिल्हा परिषद सदस्या विणाताई मालेकर, पंचायत समितीच्या उपसभापती सिंधुताई आस्वले, कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती साईनाथ कुळमेथे, सुरेश मालेकर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष उमेश राजुरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, ग्रामविकास अधिकारी ढेंगळे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव ढवस, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव बापूजी पिंपळकर, राष्ट्रसंत पुतळा समितीचे अध्यक्ष देवराव आष्टेकर, आनंद पावडे, श्रावण चौके, पुंडलिक मोरे, हनुमान मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती ढवस, ग्रामपंचायत सदस्य संगीता ठाकरे, शेख रशीद, श्रीरंग उरकुडे, दादाजी भेसुरकर, देवराव ढेंगळे, माजी उपसरपंच राजकुमार हेपट, कवडू पिंपळकर, उत्तम काळे, नथू काकडे, राजेंद्र काकडे, देवराव कोडापे, किसन भडके, हरी मोरे, मारोती सोनटक्के, गिरीधर आमने व इतर गावकऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन शामकांत पिंपळकर यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच आशिष देरकर यांनी केले. तर आभार स्नेहा काकडे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले.