‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ लसीकरण करा

 

जि.प.अध्यक्षा संध्या गुरनुले : फिनिक्स साहित्य मंचातर्फे कवितासंग्रहाचे प्रकाशन

By ÷ Avinash poinkar
चंद्रपूर :

जिल्ह्यातील कवी-लेखकांनी कोरोनाकाळात साहित्य लेखन करुन जनजागृती केली‌. हे खुप आशादायी आहे. या काळात प्रत्येकांनी स्वत:चे व कुटुंबाचे तसेच समाजाचे संरक्षण करावे. समाजात व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार महत्त्वपुर्ण आहे. ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी व्यक्त केले.

फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूर व पंचायत समीती गोंडपिंपरीच्या माध्यमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनात ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ या कोरोना लसीकरणाबाबत संदेश देणा-या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे नुकतेच त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. यासाठी विशेष पुढाकार घेणारे गोंडपिपरीचे सहायक गटविकास अधिकारी कवी धनंजय साळवे, फिनिक्सचे अध्यक्ष कवी नरेशकुमार बोरीकर, अविनाश पोईनकर, गोपाल शिरपूरकर यांनी ‘श्वास पुन्हा घेण्यासाठी’ या कोरोनाविषयक लसीकरण जनजागृतीच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह संपादित केला.

संदेश कोरोना लसीकरणाचा या विषयावर कविंचे आॅनलाईन कविसंमेलन घेण्यात आले. सदर कविता जनजागृतीच्या उद्देशाने पुस्तक रुपाने संपादित करण्यात आल्या. यात जिल्ह्यातील कवी सुरेंद्र इंगळे, धर्मेंद्र कनाके, जयवंत वानखडे, सुनील बावणे, संतोषकुमार उईके, विजय वाटेकर, पंडीत लोंढे, राजेंद्र घोटकर, मिलेश साकूरकर, अरुण घोरपडे, बि.सी.नगराळे, नरेंद्र कन्नाके, राजेंद्र पोईनकर, सुधाकर कन्नाके, संभाजी गावंडे यांच्या कवितांचा समावेश आहे.

 

जिल्हा प्रशासनाकडून उपक्रमाचे कौतुक

कोरोना निर्मुलनासाठी जिल्ह्यातील साहित्यिकांच्या साहित्यातून जनजागृती करणा-या या उपक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून विशेष दखल घेण्यात आली. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, मुख्य लेखा अधिकारी अशोक मातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सोमनाथे, गोंडपिपरीचे गटविकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमचंद कन्नाके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सध्याच्या काळात साहित्याचा सकारात्मक उपयोग करणा-या लोकहितावह अशा उपक्रमाची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

####

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *