आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यात रस्ते बांधकामांचे भूमिपूजन.

By : Mohan Bharti

कोरपणा :– कोरपणा तालुक्यात आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नारांडा, अंतरगाव आणि सांगोडा येथे २५:१५ ग्रामीण विकास निधी २०१९- २० अंतर्गत मंजूर रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात मौजा नारंडा येथे १० लक्ष रुपये, मौजा अंतरगाव येथे २० लक्ष रुपये, मौजा सांगोडा येथे १० लक्ष रुपये मंजुर निधीच्या अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर गावात रस्ता विकास कामांना प्राधान्य दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार सुभाष धोटे यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. आभार मानले. या प्रसंगी जि प सदस्या विनाताई मालेकर, प स सभापती रुपाली तोडासे, उपसभापती सिंधुताई आस्वले, सुरेश पाटील मालेकर, उपविभागीय अभियंता पिंजारकर, कनिष्ठ अभियंता मिना रामटेके, अंतरगाव सरपंच सरिता पोडे, उपसरपंच श्यामकला पिंपळशेंडे, उपसरपंच सांगोडा ज्योती धोटे, ग्रा प सदस्य प्रियांका रागिट, सरिता देवाळकर, विजय लांडे, सचिन बोंडे, नारंडा मनोहर पाटील बोबडे, सदाशिव पोटदुखे, तुळशीराम धोंगडे, मारूती पोटदुखे, मिलिंद ताकसांडे, प्रदीप मालेकर, प्रकाश मुहूर्ले, पुरुषोत्तम गुगुल, मारुती लोखंडे, हिराजी वांढरे, बंडू कांबळे, सरपंच अनुताई ताजणे, ग्रा प सदस्य गजानन नक्षिणे, महेंद्र वडस्कर, गणेश गिरसावळे, विजया काकडे, रूंदा पानघाटे, सिंधु टोंगे, माजी सरपंच बाळा पाटील वडस्कर, पो. पाटील आनंदराव मडावी, ग्रामसेवक प्रशांत ताटेवार, मंगेश वडस्कर, वनकर सर, रोमाजी पाटील, प्रमोद पिंपळशेंडे, स्वप्नील माणूसमारे, नितीन पोडे, भिमराव पाटील, गजानन उलमाले, श्रीधर वडस्कर, बंडू खेलूरकर, राहुल खेलूरकर यासह नारंडा, अंतरगाव, सांगोडा येथील ग्रामस्थ उपस्थीत होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *