लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपिपरी :–जिल्ह्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र असलेल्या धाबा येथे आमदार सूभाष धोटे यांच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले. धाबा परिसरातून मोठ्या प्रमाणात गंभीर आजार असलेल्यांना गोंडपिपरी ग्रामीण रूग्णालयात रेफर केल्या जाते. मात्र सूसज्ज रूग्णवाहीका नसल्याने अनेक अडचणीं रूग्णाना भेडसावीत होत्या. ही समस्या आमदार सूभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी खनिज कल्याण निधीतून सूसज्ज रूग्णवाहीका धाबा आरोग्य केंद्राला मंजूर केली. आज आमदार धोटे यांच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॕ.चकोले, डाॕ.लोणे, एम.बी सिडाम, तालुका काँग्रेस अध्यक्ष तुकाराम झाडे, नामदेव सांगडे, सचिन फुलझले, संतोष बंडावार, जिंतेद्र गोहणे, शंकर येलमुले ,दिलीप पुलगमकर उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात आमदार सुभाष धोटे यांनी स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष दिले. ते सतत नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळेच त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिकता दिली. त्यांनी धाबा आणि परिसरातील नागरिकांसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.