लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*माजी वित्तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार*
माजी वित्तमंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणखी १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रॅटर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वितरित करण्यात आल्याने ही संख्या आता १६७ झाली आहे.यापूर्वी १५२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रॅटरचे वितरण आ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
कोरोना महामारीचं दुस-या लाटेचं संकट कमी होत आहे. तरीही सावधानी व खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतांना जिल्हयातील आरोग्य सेवा सर्व सोयीसुविधायुक्त व्हाव्या यासाठी आ सुधीर मुनगंटीवार यांचे मार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून
महानगर भाजपा च्या वतीने सोमवार (७ जुन) ला शासकीय विश्रामगृह येथे आयोजित एका कार्यक्रमात ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातुन व आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन प्राप्त झालेल्या १५ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण आ मुनगंटीवार यांचे हस्ते विविध सेवाभावी संस्थांना करण्यात आले.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, माजी आ. अॅड. संजय धोटे, भाजपा महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभुषण पाझारे, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, प्रशांत विघ्नेश्वर, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, विठ्ठलराव डूकरे, रवी लोणकर, संदिप आगलावे, नगरसेवक छबुताई वैरागडे, रामकुमार आकापेल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी आमदार निधीतुन ८ रुग्णवाहीका, शासकीय रुग्णालयाला १७ व्हेंटीलेटर व १५ एन.आय.वी. आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या.तर जिल्हयात ५ लक्ष मास्कचे वितरण आ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा तर्फे करण्यात आले. हेच नाही तर मागणी नुसार फेसशिल्डचे देखील वितरण भाजपाने केले आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे पुर्ण शक्तीने सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत.
सोमवार ७ जून ला आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूरातील गजानन महाराज मंदिरचे संदिप देशपांडे यांना २, सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाटसाठी येथील उदासी सेवा संस्थांचे चोखादास अलमस्त यांना २, चंद्रपूरातील बाल गणेश मंडळाच्या छबुताई वैरागडे यांना २, उपमहापौर राहुल पावडे यांना १, कोरपना तालुक्यातील नारंडा पी.एस.सी. अॅड. संजय धोटे यांना २, चंद्रपूरातील लिंगायत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या संजय धारणे व महेश व्यवहारे यांना १, भद्रावतीसाठी भाजयुमो चे इम्रान खान यांना १ व चंद्रपूर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अमिन शेख यांना १, गडचिरोली जिल्हयातील अहेरी करीता सुनिल मेहेर व अमित बिश्वास यांना ३ याप्रमाणे १५ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकर्पण करुन वितरण करण्यात आल्याने आ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आता पर्यंत एकूण १६७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रॅटर कोविड रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहेत.