* लोकदर्शन 👉 मोहन भारती ++===============
गडचांदूर,
महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन राज्यशास्त्र परिषदेचा प्रथम वर्धापन दिन बुधवार ( ता.९ जून २०२१) रोजी सायंकाळी ५ वाजता गुगलमीट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुमित पवार यांनी दिली आहे.
कोविड – १९ च्या संकटामुळे हा प्रथम वर्धापन दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.मनोहर संस्थापक शब्दसृष्टी मुंबई ,तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.गिरीश कुलकर्णी संस्थापक स्नेहालय , हे लाभले आहेत.या ऑनलाईन कार्यक्रमाची लिंक ७ जून रोजी व्हाट्सअँपच्या माध्यमातून सर्व प्राध्यापक बंधू – भगिनींना पाठविण्यात येणार आहे.
राज्यशात्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या स्थापनेला ९ जून २०२१ रोजी १ वर्ष पूर्ण होते आहे.या एक वर्षाच्या कालावधीत परिषदेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .परिषदेने कोविड – १९ च्या शाळा बंद पण शिक्षण सुरू आशासंकट काळात इयत्ता अकरावी आणि बारावीच्या ला राज्यशास्त्र विषय घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे काम केले आहे., अभ्यासक्रमाचे व्हिडिओ ,प्रश्नपत्रिका संच , प्रश्नपेढी , ऑनलाईन टेस्ट , हस्तलिखित नोट्स , परीक्षेला जात जात(points to remember ) बोर्डाची प्रश्नपत्रिका काशी सोडवावी याचे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन आशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यशात्र विषयाचे मार्गदर्शन केले.
२६ नोव्हेंबरचा संविधान दिन साजरा करणे , २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे , संविधान दिनानिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा, सविंधनावर आधारित निबंध स्पर्धा, अशा विविध स्पर्धा परिषदेने मागील वर्षी आयोजित केल्या होत्या ,त्याला राज्यातील विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. तसेच प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांमध्ये राज्यशास्त्र विषयाची आवड निर्माण करणे , पुनर्रचित अभ्यासक्रमावर चर्चा घडवून आणणे, राज्यशात्र विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांचे प्रश्न सोडविणे , शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करणे , विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे असे उपक्रम सुद्धा परिषदे च्या वतीने मागील वर्षभरात राबविण्यात आले .
दिनांक 9 जून रोजी आयोजीत ऑनलाईन वेबिनराच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या प्रथम वर्धापन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निशिगंधा जाधव करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थीत असणाऱ्या मान्यवरांचे स्वागत स्वागत गीताच्या माध्यमातून कु.ख्याती आणि कु.खुशी मानमोडे ह्या करणार आहेत.तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय प्रा.सुनीता जमणे करून देणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि कोरोना सारख्या महामारीला बळी पडून दुर्दैवाने स्वर्गवासी झालेले परिषदेचे कार्याध्यक्ष स्व.प्रा.भगवान चौधरी आणि इतर प्रा.बंधू – भगिनींना श्रद्धांजली प्रा.पितांबर उरकुडे राज्यसचिव हे वाहतील ,
तर परिषदेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेणारी ध्वनी चित्रफीत प्रा.हर्षदा दरेकर सादर करतील.नंतर प्रमुख अतिथींचे भाषण होईल.त्यानंतर अध्यक्षीय भाषण आणि नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा परिषदेचे अध्यक्ष प्रा.सुमित पवार हे करतील.आणि शेवटी उपस्थीत मान्यवरांचे आभार प्रा.शरद जोगी मानतील.आणि कार्यक्रमाचा समारोप होईल.
तरी या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील राज्यशास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या जास्तीत जास्त प्राध्यापक बंधू – भगिनींनी उपस्थीत रहावे असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे..