लोकदर्शन प्रतिनिधि 👉 रंगनाथ देशमुख
दारू माफिया, गांजा, चोरी करून आणलेल्या गाड्या ,टवाळखोरी अशा एक ना अनेक भानगडी एरीकेशन कॉलनी मध्ये सुरु असून प्रशासन व एरीकेशन डिपारमेंट मार्फत कोणत्याही प्रकारचे जनहितार्थ पाऊल उचलले जात नसल्याने या कॉलनीत राहणाऱ्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागत आहे
आजच संबंधित एरीकेशन कॉलनी मध्ये काही जणांनी तेथील एरीकेशन अधिकाऱ्याच्या घरी जाऊन धुडगूस घातला व त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली कारण फक्त एकच होते बाजूच्या कॉटर ची चाबी देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे सदर प्रकरण एरिकेशन कॉलनीतील इतर पदाधिकारी, जनसमुदाय पहात होता परंतु कोणीही हस्तक्षेप केला नाही
कारण या माफियांच्या विरोधात जाणार तरी कोण यामुळे संपूर्ण एरीकेशन कॉलनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे एरीकेशन कॉलनी चे उच्च अधिकारी व पोलीस प्रशासन याकडे लक्ष देईल का की दिवसेंदिवस एरीकीशन कॉलनी अवैध धंद्यांचा गड बनत वाढत राहील