आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते डेमो हाऊस चे भुमीपुजन व सीसीटीव्हीचे लोकार्पण.


लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरापणा ) :– प्रधानमंत्री आवस योजने अंतर्गत *डेमो हाऊस* चे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज भूमिपूजन पार पडले. सोबतच पंचायत समिती कोरपना येथील कार्यालय परिसरात निगराणी करण्यासाठी लावण्यात आलेले सीसीटीव्हींचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नागरी वस्ती करिता २ लाख ५० हजार रुपये किमतीचे तर ग्रामीण वस्ती करीता १ लाख ४० हजार रुपये किमतीचे घर लाभार्थीना उपलब्ध होणार आहेत. या घरांचे नेमके स्वरूप कसे असेल याचा नमुना डेमो हाऊस पंचायत समिती कार्यालय परिसरात तय्यार करण्यात येणार आहे. ज्यात लाभार्थी नागरिक मिळणाऱ्या घराचा नमुना पाहु शकणार आहेत. तर पंचायत समिती कार्यालयात २ लाख ९५ हजार रुपयाच्या जिल्हा निधीतून २० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
या प्रसंगी रुपाली तोडासे सभापती, सौ सिंधूताई आस्वले उपसभापती, जि. प सदस्य सौ. कल्पना पेचे, सौ विनाताई मालेकर, विजय बावणे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक, शाम रणदिवे माजी सभापती, माजी जि प सदस्य उत्तम पेचे, संबा पाटील कोवे, सिताराम कोडापे, सुरेश मलेकार,भाऊराव पाटील चव्हाण, गणेश गोडे, शैलेश लोखंडे, उमेश राजूरकर, रेखा घोडाम, शालीनी बोंडे सरपंच , बाबाराव पाचपाटील गट विकास अधिकारी,विनोद खपाने उपविभागीय अभियंता यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *