By : Mohan Bharti
गडचांदूर : महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील उपक्रमशील शिक्षक श्री.विठ्ठलराव कुमरे 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे ला सेवानिवृत्त झाले, त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते अध्यापनात वेगवेगळे प्रयोग करणारे ,स्वतःचे शैक्षणिक साहित्य निर्माण करणारे, आपल्या बोलण्याने सर्वांना आपलेसे करणारे मृदभाषी , आपल्या प्रदीर्घ 31 वर्षाचा अध्यापन अनुभव विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणारे दि.31/05/2021 ला सेवानिवृत्त झाले. तसेच महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली येथील कर्तव्यदक्ष, कृतीशील, विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री विनोद एकरे सुद्धा प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे ला सेवानिवृत्त झाले. गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर च्या,वतीने महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील सभागृहात दोन्ही सेवानिवृत्त शिक्षकांचा भावपूर्ण सत्कार 31 मे ला करण्यात आला. सत्कार समारंभच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे होते,,तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक विकास भोजेकर, मुख्याध्यापक कृष्णा बततुलवार,मुख्याध्यापक शरद जोगी,(सोनूर्ली)उपमुख्याध्यापीका प्रा, सौ,स्मिताताई चिताडे,पर्यवेक्षिका श्रीमती शोभाताई घोडे, होत्या.याप्रसंगी मनोहर बुऱ्हाण यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.उपस्थित अतिथीनि सुद्धा सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्याची प्रशंसा केली, व पुढील सुदृढ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या,
सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलराव कुमरे,व विनोद एकरे यांनी सत्कारा ला उत्तर देताना संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती शोभाताई घोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ,किरण पोगुलवार ,यांनी केले. याप्रसंगी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,