By : shivaji Selokar
आमदार मुनगंटीवार यांच्या आमदार निधी व बल्लारपूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ३० बेडेड ऑक्सीजन व ७० बेडेड दवाखान्याचे बल्लारपूर क्रिडा संकुल येथे लोकार्पण
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर शासन, प्रशासन व जनता सुध्दा थोडी बेफीकीर झाली होती. त्यामुळे आलेल्या दुस-या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगीतल्याप्रमाणे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याला अनुसरून सर्व स्तरावर तयारी असावी या उद्देशाने आज आमदार मुनगंटीवार यांच्या आमदार निधी व बल्लारपूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर क्रिडा संकुल येथे ३० ऑक्सीजन बेड व ७० साधे बेड अशा १०० बेडेड दवाखान्याचे लोकार्पण करताना मला अतिशय आनंद होतोय. अशा शब्दात लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी ते पुढे म्हणाले की खरेतर यापुढे अशी कुठलीही लाट येवूच नये पण सावधानी म्हणून आपण वैद्यकिय दृष्टया पूर्णपणे तयार असावे या उद्देशाने मी बल्लारपूर नगर परिषद पदाधिकारी व अधिकारी यांना असा दवाखाना उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. या सगळयांनी या इच्छेला आकार देत अतिशय कमी वेळात व तरी सुध्दा अतिशय व्यवस्थीत व सुंदर व्यवस्थेसह या दवाखान्याची निर्मीती केली. प्रशस्त बेड, गादया, चादरी, ऑक्सीजन पाईपलाईन, बायपॅप मशीनसह ऑक्सीजन बेड, स्वच्छ प्रसाधन गृहे, अद्यावत कर्मचारीवर्ग यासर्व सुविधांसह या दवाखान्याची निर्मीती करण्यात आली आहे. या करिता मी सगळयांचे अभिनंदन करतो व पुढे येणा-या रूग्णांना उत्तम सेवा आपल्या हातून मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो.
कार्यक्रमाला बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विजय सरनाईक, डॉ. गजानन मेश्राम, आरोग्य सभापती येलय्या दासरप, शहर भाजपाध्यक्ष काशी सिंह, मनीष पांडे, निलेश खरबडे, समीर केने, अॅड. रणंजय सिंह, महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडीचे अजय दुबे, सौ. रेणुका दुधे, सौ. वैशाली जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.