माणुसकीच्या भिंतीचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन


लोकदर्शन 👉 मोहन भारती
न. प. राजुरा तर्फे गरजू लोकांकरिता ”नेकी की दीवार” चा उपक्रम.

राजुरा (ता.प्र) :– नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते “माणुसकीची भिंत” चे उद्घाटन करण्यात आले. नगर परिषद राजूरा ने गरजू लोकांकरिता ‘नेकी की दीवार’ (माणुसकीची भिंत)हा एक आगळा वेगळा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम चालू केला आहे. जिल्हा परिषद हायस्कुल शाळेसमोर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म माणुसकीचा भिंत तयार करण्यात आली आहे. ज्यांना आपल्या घरातील निकामी वस्तू ,कपडे अन्य जीवन उपयोग साहित्य निकामी असल्यास त्यांनी माणुसकीच्या भिंतीवर आणून ठेवावे. जेणेकरून ते गरीब, गरजू लोक याचा गरजेनुसार उपयोगात आनतील.
अशा या नेकी की दीवार (माणुसकीचा भिंत )चे उदघाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष सूनिल देशपांडे, मुख्याधिकारी अर्शिया जुही, आनंद दासरी आरोग्य सभापती, हरजितसिंग संधू बांधकाम सभापती, गजानन भठारकर सभापती व सर्व नगरपरिषद कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. गरीब गरजू लोकांपर्यंत निकामी असलेले साहित्य कपडे व इतर वस्तूंची उपलब्धता होईल. माणुसकीचा एक चांगला संदेश समाजातील प्रत्येकाला जाईल व सर्वांना गरजवंतांसाठी फुल ना फुलाची पातळीची मदत करून भागिदार बनता येईल. राजुरा नगर परिषदेच्या या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *