लोकनेते नितीनजींचा आदर्श समोर ठेवून सेवाकार्य करा : आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar

नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण

आतापर्यंत 88 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे वितरण

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता तिचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहायचे आहे. आपल्याला जनसेवेसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे . संकटसमयी मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता भाजपाचाच कार्यकर्ता असतो अशी आपली ओळख आहे . ही ओळख जपत आपल्याला कार्य करायचे आहे. कोरोना काळात आपले नेते नितीनजींनी सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी जो पुढाकार घेतला तोच आदर्श समोर ठेवून आपणही सेवाकार्य करू , असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर चे वितरण करण्यात आले. यात प्रामुख्याने दुर्गापूर साठी 3 , जिवती साठी 2 , वरोरा साठी 2, गडचांदूर साठी 2 असे एकूण 9 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वितरित केले.यावेळी भाजप नेते रामपाल सिंह , हनुमान काकडे, गौतम निमगडे , जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते, दत्ताजी राठोड, तिरुपती कुंडगिर , सुधाकर राठोड , वरोरा येथील भाजप नेते बाबा भागडे, डॉ भगवान गायकवाड , जगदीश तोटावार, गडचांदूर येथील सतीश उपलेंचवार , रामसेवक मोरे , नतथु नक्षीणे यांची उपस्थिती होती.

आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर , बल्लारपूर , मूल , पोम्भूरणा , घुग्गुस , मानोरा , नकोडा , पांढरकवडा, ताडाळी , डॉ हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती आदी ठिकाणी 88 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर वितरित केले आहेत . यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *