लोकदर्शन 👉 मोहन भारती
महिला काँग्रेसच्या एक घास मदतीचा उपक्रमांतर्गत २५० गरजूंना घरून तयार केलेले जेवणाच्या डब्यांचे वितरण.
चंद्रपूर :– महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना काळामध्ये कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना, रुग्णवाहिका चालक आणि गरजूंना एक घास मदतीचा या उपक्रमांतर्गत मोफत अन्नदान वितरित करण्यात येत आहे. दिनांक १६ मे ला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत आज उपक्रमाच्या आठव्या दिवशी स्व. राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी स्वतः घरून जेवणाचे डब्बे आनून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना, रुग्णवाहिका चालक आणि गरजूंना मोफत अन्नदानाचे वितरण केले.
आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव ठेवून कोरोना या महामारी च्या गंभीर काळात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून गरजूंसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या संकल्पनेतून एक घास मदतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला आमदार सुभाष धोटे यांनी तन मन धनाने सहकार्य दर्शविले असून मागील तीन दिवसांपासून राजुरा येथे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. आज शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे आमदार सुभाष धोटे यांनी स्वतः उपस्थित राहून जवळपास २५० गरजूंना मोफत अन्नदान वितरित केले. या प्रसंगी नगरसेवक नंदु नागरकर, सुनिता लोढीया, संगीता भोयर, ललिता रेविलवार, नाहीद काझी, परवीन सय्यद, भगत मॅडम यांनी देखील गरजूंसाठी घरचे जेवण व फळे आनले होते. तसेच हरीश व प्रिया प्रजापती यांनी देखील आपल्या लग्नवाढदिवसानिमित्य मोफत अन्नदान केले.
महिला काँग्रेसच्या नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या संयोजनात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्षा सुनिता धोटे, हर्षा चांदेकर, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, ब्लाॅक अध्यक्ष शितल काटकर, सदस्य लता बारापात्रे, वैशाली तुमराम, प्रवीण पडवेकर, राजेश सिंग चव्हाण, रुचीत दवे, राजू दास, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.