By : Mohan Bharti
स्व. राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान, मास्क, सॅनिटायजर चे वितरण.
राजुरा :– भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे एक घास मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राजुरा काँग्रेसच्या वतीने मोफत अन्नदान, मास्क, सॅनिटायजर चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने २६ आॅक्सिजन कान्सन्ट्रेटर कार्यान्वित करण्यात आले. यात आमदार फंडातून १०, अंबुजा सिमेंट कडून ७, सि एस आर फंडातून ५, जिल्हा औषधी भंडार कडून ४ आॅक्सिजन कान्सन्ट्रेटर येथे कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी येथे होऊ घातलेल्या ऑक्सिजन प्लांट च्या जागेची सुद्धा पाहणी केली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार हरीष गाडे, वैद्यकीय अधिक्ष डॉ. लहू कुलमेथे, उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, मुख्याधिकारी आर्शीया जुही, अंबुजा सिमेंटचे वाईस प्रेसिडेंट संजीव राव, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, स न यो अध्यक्ष साईनाथ बतकमवार, ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, प स सदस्य तुकाराम मानुसमारे, सिनेट सदस्य अजय बतकमवार, निर्मला कुडमेथे, शुभांगी खामनकर, योगिता भोयर, पुनम गिरसाळवे, अॅड. रामभाऊ देवईकर, लहू चहारे, कवडु सातपुते, विकास देवाळकर, धनराज चिंचोलकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेन्डे, जगदीश बुटले यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.