मूल येथील कोविड केअर सेंटर ला हंसराज अहीर यांची भेट


By ÷ Shivaji Selokar
*सेवारत परिचारीकांचा केला सन्मान*

चंद्रपूरः- मूल नगर पालिकेमार्फत शहरात नगर पालिका शाळेत कोविड रुग्णांसाठी 150 बेड चे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटर ला पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली व तेथील व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. कोविड केअर सेंटर मध्ये कोविड रुग्णांसाठी केलेली व्यवस्था चांगली असून नगर परिषद ने केलेल्या या कार्याबद्दल अहीर यांनी नगराध्यक्ष व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी नगराध्यक्ष सौ रत्नमाला भोयर, पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार, नगर परिषद उपाध्यक्ष नंदू रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, नगरसेवक प्रशांत लाडवे, महेंद्र करकाडे, राकेश ठाकरे, संजय येनुरकर, राजू पाल यांची उपस्थिती होती.
पुढील काळात तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली असल्याने त्यादृष्टीने ही नियोजन नगर परिषद करीत असल्याचे दिसून आले. लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तयार करण्याच्या सुचना अहीर यांनी यावेळी नगराध्यक्ष यांना केल्या. कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत डाॅक्टर्स व परीचारीकांचा यावेळी हंसराज अहीर यांनी सन्मान केला.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *