कोरपना तालुक्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील 870 व्यक्ती चे झाले लसीकरण

गडचांदूर, लोकदर्शन-÷ मोहन भारती ‘===============
कोरोना चा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाने 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्ती करिता लसीकरण महाराष्ट्रात 1 मे पासून सुरू केले,
कोरपना तालुक्यात एकमेव लसीकरण केंद्र गडचांदूर येथील नगर परिषद जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 6 मे ला सुरु करण्यात आले,
6 मे ते 13 मे पावेतो एकूण 870 व्यक्ती ला कोव्याकसिंन लस दिली ,शासनाच्या आदेशानुसार 14 मे पासून लसीकरण बंद करण्यात आले आहेत,अशी माहिती मुख्याधिकारी डा, विशाखा शेळकी यांनी दिली,
18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्ती लसीकरण च्या प्रतीक्षेत आहेत, लसीकरण केव्हा सुरु होईल,हे अद्याप स्पष्ट केले नाहीत,
शासनाने 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्ती चे लसीकरण तातडीने सुरु करावे अशी मागणी आहे,

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *