By : Shivaji Selokar
कष्टकरी व हात मेहनतीने काम करणाऱ्यांना पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या कडून आर्थिक मदत
चंद्रपूर— कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविलणयासाठी राज्य शासनाने राज्यात लॉक डॉउन लागू केला. त्यामुळे कष्टकरी व हातावर काम करणाऱ्यांचे रोजगार बुडल्यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व विजयभाऊ वडेट्टीवार मित्र परिवार यांच्याकडून ब्रम्हपुरी मतदार क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली व सिदेवाही तालुक्यातील कष्टकरी व हातमजुरीने काम करणाऱ्या सलूनवाले, चहाचे टपरीवाले, घरकाम करणारे, रिक्शावाले, आटो चालक,डपरे वाजविणारे समाज , चपल बनविणारे व दुरुस्त करणारे मोची, लोहार, सुतार यांच्यासह कष्टकरी काम करणाऱ्या परिवाराना प्रत्येकी एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेऊन याचा शुभारंभ आज ब्रम्हपुरी येथे करून ब्रम्हपुरी तालुक्यातील 200 लोकांना प्रत्येकी हजार रुपयांचे वाटप विजय वडेट्टीवार यांनी केले.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे बघून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लॉक डॉऊन लागू केला. त्यामुळे कष्टकरी व हातावर काम करणारे रिक्षा चालक, सलूनवाले, रस्तावर चहा विकणारे, पान टपरी वाले, घरकाम करणाऱ्यासह कष्टकरी व हातावर काम करणाऱ्याचे रोजगार बुडल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावे लागत होते. सतत जनतेच्या संपर्कात असलेले आणि भाऊ म्हणून मदतीसाठी धावून जाणारे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा आपला परिचय दिला. माझ्या दरवाज्यात येणारा दुःखी माणूस नेहमी हसत जावे हे त्यांचे ब्रीद वाक्य. माझ्याकडे जे काही आहे ते समाजासाठी आहे. याच उदात्तपणे कुठेही संकट आले की मदतीसाठी वडेट्टीवार धावून जातात. आताही त्यांनी त्यांच्या वतीने मदतीचा उपक्रम सुरू केला. जे देतात ते स्वतः कडून देतात हीच त्यांची खासियत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात लॉक डाऊन सुरू झाले तेव्हापासून कष्टकरी व हातावर काम करणाऱ्याचे रोजगार बुडाला. त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावे लागत असल्याचे बघून ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील सलूनवाले, चहाचे टपरीवाले, रिक्षावाले, आटो चालक, घरकाम करणारयासह कष्टकरी व हातावर काम करणाऱ्याचे परिवाराला विजय वडेट्टीवार व विजयभाऊ वडेट्टीवार मित्र परिवार यांच्याकडून प्रत्येकी हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेऊन या वाटपाचा शुभारंभ ब्रम्हपुरी येथे केला. विजयभाऊ वडेट्टीवार मात्र परिवार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 200 लोकांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले. याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगर परिषद बांधकाम सभापती विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरसेवक नितीन राऊत, श्रीमती पारधी, मुन्ना राऊत, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.