आपला आरोग्यमंत्र !!
By÷Shankar Tadas
उठून प्रभाती योगासन, प्राणायाम
नियमित गृहकामे, मुखी गोड नाम
मुखमार्जन रात्री आणिक सh.bकाळी
औषधी मंजन किंवा निमकाडी
साजेसा परिधान, स्वच्छता पाळावी
गृही टापटीप, दोनदा आंघोळ करावी
सकाळी न्याहारी नियमित करी
फळे, उसळ, दूध किंवा भाकरी
वयापरी खावे आणिक वागावे
हेळसांड केलीया वृद्धत्वी भोगावे
शतायुषी हवे भक्कम शरीर
मन राखी साफ आणि स्थिर
परिसरी उगवते आवडीने खावे
उगाच चराया बाजारा का जावे ?
वैद्य, जाणकार त्याचे थोर उपकार
मार्गदर्शन घेऊन ठरवावा नित्याहार
किती आणि कसे, केव्हा काय खावे
भला गडी तोची ज्यासी त्वरे ठावे
शाकाहार, मांसाहार फालतू विचार
गरज, शेजार यापरी करा स्वीकार
शारीरिक श्रम असता भक्कम
अन्न घ्यावे अधिक हाची नेम
उपवास एक असो द्यावा आठवडी
नियंत्री भुकेला व जिभेची आवडी
रात्रीचे नऊ ते पहाटे पाच
निवांत झोप घ्या सात तास
शरीराशी श्रम, मनाला विश्राम
हाची मूळमंत्र असू द्यावा ठाम
देह विश्वाचा घटक, सर्वाभूती तोची एक
त्याची स्वीकारून सत्ता जगू या सम्यक
: शंकर तडस
9850232854