लोकदर्शन 👉 रंगनाथ देशमुख =
➡️कोवीड सेंटर मधील रुग्णांची सर्वस्व जबाबदारी प्रशासकीय अधिकारी व स्थानिक नेते मंडळी ची आहे
साहेब जेवायला बरोबर भेटत नाही, आम्ही उपाशी मरायचं का ??को वीड सेंटरमधील रुग्णांचा धगधगता प्रश्न
मागील अनेक दिवसांपासून जीवती येथील कोवीड सेंटरला सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यकुशलतेने व मनसेच्या लक्षवेधी कार्यामुळे आमदार साहेबांनी सुरुवात केली परंतु आज पर्यंत येथी कोवीड सेंटरमधील रुग्णांना नाश्त्याची व जेवणाची सुविधा योग्य त्या पद्धतीने मिळत नसून याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत ,यासंदर्भात संदर्भीय माहिती काढल्यास जेवण व नाश्त्याची सुविधा करण्यासाठी प्रशासनाकडे आर्थिक मदत मागितली असून सदर रक्कम प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे जिवती येथील कोवीड सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णांना योग्य तो आहार मिळत नाहीये ,यास प्रशासन तकार अकार्यक्षमतेमुळे खचलेले दिसते, करिता यावर उच्च अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन त्वरित योग्य तो पाऊल उचलावा अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी केलेले आहे .