लोकदर्शन ÷मोहन भारती———-🔶🔶🔶🔶
राजुरा:– कोरोना परिस्थिती नियंत्रणात आनणेसाठी केंद्र व राज्य सरकारकडुन कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारने लसीकरण करून नागरीकांना निरोगी बनविण्याचे कार्य हाती घेतले आहे. ४५ वर्षापुढील वयोगटातील नागरीकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अनेक नागरीकांना पहिल्या व दुसऱ्या लसीचा डोज मिळालेला नाही. अनेक नागरीकांना पहिल्या डोजनंतरचा कालावधी २ महिण्यापेक्षा अधिक झालेला आहे. तसेच ग्रामीण भागात अजुनही लसीचा पुवठा झालेला नाही. दुसरा डोज अजुनही न मिळाल्याने आबालवृध्द व ४५ वर्षावरिल नागरीकांमध्ये आरोग्य यंत्रणा व प्रषासनाविशयी असंतोश पसरलेला आहे.
करीता महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांसाठी तातडीने कोव्हीड लस उपलब्ध करून देणेबाबतची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि महाराष्ट्राचे सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.