लोकदर्शन 👉 मोहन भारती ÷🟦 🔶🔶🔶🔶🔶🔶
⭕÷आमदार सुभाष धोटेंची जिल्हाधिकाऱ्यांकडेव तक्रार.
राजुरा (ता.प्र) :– सध्या देशात, राज्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ात कोरोना प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. कोरोणाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी शासन, प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रात चारही तालुक्यात कोरोना केअर सेंटर सुरू आहेत. येथील कोरोना रुग्णांना उत्तम व्यवस्था पुरविण्यासाठी आपण सर्व कट्टीबद्ध आहोत. मात्र माझ्या मतदारसंघातील कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक कोरोना केअर सेंटर मधील रुग्णांशी आस्थेने संवाद साधून तब्येतीची विचारना केली असता येथे स्वच्छता व भोजन व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी आढळुण आलेल्या आहेत. जेवनामध्ये पोषण आहार मिळत नसल्याचे आढळुण आले. रूग्णांना आठवडयातुन दोन दिवस अंडी व मासाहारी आहार पुरविणे आवश्यक असतांना मात्र ते मिळत नसल्याचे आढळुण आले आहे.
येथील मुख्य पुरवठादाराने सहपुरवठादार तयार करून प्रतिदिन 200 रूपयाचे भोजन 150 रूपयात पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. कोविड काळात सेवेच्या नावाखाली नफेखोरी कमाविण्याच्या वृतीतुन सदर प्रकार सुरू असल्याचे निदर्शनात येते, ही बाब माणुसकीला काळींमा फासनारी असून असे प्रकार घडणे हे निदंणीय आहे.
रूग्णांना पोषण आहार पुरविणे संबंधित पुरवठादाराची जबाबदारी असतांनासुध्दा याकडे पुरवठादार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोव्हीड केअर सेंटर मधील भोजन व्यवस्थेबाबत चौकशी करून रूग्णांना प्रोटिनयुक्त पोषण आहार पुरविणे तसेच कोव्हीड सेंटर मध्ये स्वच्छता ठेवण्याबाबतच्या सुचना संबधितांना देण्यात याव्यात अशी तक्रार आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा चंद्रपूर यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.