लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा (ता.प्र) :– सध्या देशात आणि राज्यत कोरोना प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढत असून सर्वत्र फार गंभीर परिस्थिती बघायला मिळत आहे. राज्यत तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ात कोरोना संसर्गाने जनमानस त्रस्त आहेत. येथे शासन, प्रशासन, राजकिय नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था व इतर अनेक सुद्धा हरसंभव प्रयत्न करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी झटत आहेत. हे संकट मोठे आहे. संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांना आवश्यक मदत करण्याची गरज आहे. अशा वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सर्व स्तरातून मदत होणे आवश्यक आहे हे ओळखून फुल ना फुलाची पाकळी या न्यायाने आमदार सुभाष धोटे यांनी वैयक्तीकरित्या १ लाख ५० हजार रुपयाची मदत केली आहे. संबंधित निधीचा धनादेश आमदार धोटे यांनी राजुराचे तहसिलदार हरीश गाडे यांच्या सुपूर्द केला आहे. हा धनादेश देताना नगराध्यक्ष अरुण धोटे, हेमंत झाडे, अशोक राव उपस्थित होते.
आमदार सुभाष धोटे स्वतः राजुरा विधानसभा क्षेत्राच्या चारही तालुक्यात स्थानिक उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत असून आपल्या प्रयत्नाने आॅक्सिजन कान्सन्ट्रेटर, आॅक्सिजन बेड, अॅम्ब्युलन्स, अन्य आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. क्षेत्रातील उद्योग समूहांच्या मदतीने स्थानिक पातळीवर आॅक्सिजन बेड, कोविड केअर सेंटर क्षमता वाढविण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. स्थानिक आरोग्य सुविधांसाठी त्यांनी आपल्या आमदार विकास निधीतून १ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर अन्य निधीतूनही आरोग्य सेवेवर ते विशेष बाब म्हणून निधी खर्च करीत आहेत. आणि आता याच भुमिकेतून आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वरील १.५० लाख रुपये मदत केली आहे.
=====================🌷🌷🌷🌷🌷