लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ला आर्थीक मदत दिल्याने ‘‘माझे गाव- माझा परिवार’’ भावनेतून काम करावे*
चंद्रपूरः- जिल्हाधिकारी तथा जि.प. CEO यांची भेट घेवून जिल्ह्यातील कोविड- 19 च्या विविध अडचणीवर सुचना व माहिती देवून व्यवस्थेत अजून अधिकाधिक सुधार व नियोजनात लक्ष देण्याची गरज. डाॅक्टर्स व आॅक्सीजनच्या कमतरतेबाबत चिंता व्यक्त करून विविध मार्गातून याची पूर्तता व नियुक्ती साठी प्रशासन प्रयत्नात असल्याचे चर्चेतून समोर आले.
जिल्ह्यातील विविध मोठे उद्योजक मदतीला समोर येत नसल्याने ही बाब समोर आणुन दिली. सिमेंट, स्टील, कोल, पाॅवर प्लाॅन्ट यांचे कडे असलेल्या संसाधनाची सिलेंडर CSR मधुन काॅन्स्ट्रेटर याची पूर्तते सोबत प्रशासनाने ठरवून दिलेल्या गावात आयसोलेशन सेंटर स्थापन करून संक्रमितांच्या देखभालीसाठी जेवन व बिछायत करीता सहकार्य करण्यासाठी सुचना द्याव्यात व कोविड संकटात उद्योगांनाही मदतीला सामिल करून घेण्याच्या सूचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या बैठकीत केल्या.
रेमडीसिवरचा काही मेडीकल स्टोअरमधुन तेलंगनामध्ये स्मगलींग होत असल्याचीही माहिती देवून नियंत्रणासाठी प्रशासनाने धोरण अधिक कडक असावे असही अहीर यांनी सांगीतले.
*वन अकादमी मध्ये 160 बेडचे क्ब्भ्ब् सेंटर सुरू होत असल्याने हंसराज अहीर यांनी समाधान व्यक्त केले*
प्रशासनाने तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वन अकादमी मध्ये नवीन DCHC 160 बेडचे सुरू करण्याची कार्यवाही अंतीम टप्यात असल्याची माहिती मिळाली व ग्रामिण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारे आर्थीक मदत 20/30/50 हजार पर्यंत दिल्याने गावां गावांत आयसोलेशन (विलगीकरण कक्ष) आता स्थापन होतील यावर समाधान कारक प्रशासनाची ही भुमिका आहे असे अहीर यंानी सांगीतले.
ज्यांनी कोविड -19 DCHC/DCH सेंटरची मागणी केली त्यांना विना विलंब मान्यता द्यावी व प्रशासनानेच आॅक्सीजन पूर्ततेची जिम्मेदारी घ्यावी. त्यातून रूग्णांना फार माठी सोय होईल. मृत्युदर कमी नक्कीच होईल ही सुचना दिली.
प्रशासनाने महिला रूग्णालयातील 400 पैकी 175 बेड सद्या रूग्णसेवेत घेतले. तरी पूर्ण क्षमतेने ते रूग्णसेवेत सज्ज करावे ही विनंतीही या चर्चे दरम्यान केली. जिल्हाधिकारी व जि.प.CEO यांनी अनेक बाबतीत सहमती दर्शवून गांभिर्याने कार्यरत असल्याचे सांगीतले.