👉 लोकदर्शन
पत्रकारिता हा लोकशाहीचे चौथा आधारस्तंभ असला तरी पत्रकारिता ही आजच्या घडीला स्वतंत्रपणे होतं आहे का? याचा पाठपुरावा वेळोवेळी करणे गरजेचे आहे. *जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य* दिनानिमित्त सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमीचे विद्यार्थी “पत्रकारितेतील स्वातंत्र्य महत्त्वाचं” या विषयावर त्यांची मत प्रतिक्रियांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत.
आपल्या सर्वांना माहित आहे की पत्रकार आपल्यापर्यंत जगभरातील बातम्या पोहोचवतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक पत्रकारांना त्यांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा मिळाली पाहिजे. पत्रकारांना खूप स्ट्रगल करावा लागतो . त्यांच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली जाते. त्यांना खऱ्या बातम्या देण्यात अडथळे निर्माण केले जातात. महिला पत्रकारांना सर्वाधिक संघर्ष करावा लागतो. घरगुती कामे करणे, कुटुंबाची काळजी घेणे अशी अनेक कामे आहेत परंतु तरीही ते योग्य वेळी पत्रकारितेची सर्व कामे करतात.आमच्या आयुष्यात पत्रकारिता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
– किर्ती पटवा
साधना विद्यालय, सायन
लिखाणाच्या स्वातंत्र्यामुळे मला माझं स्वतःच मत निर्भीडपणे मांडता येऊ लागले. आज जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन या दिवशी पत्रकारांना लिखाणाचे, बोलण्याचे स्वातंत्र्य निर्माण झाले. यामुळे पत्रकारांना देखील स्वतःचे मत मांडता येऊ लागले. या दिवसाचे कौतुक करावे तितके कमी आहे.
-शोभिका नकाशे
भाऊसाहेब हिरे विद्यालय, मुंबई सेंट्रल
स्वतःचे परखड मत आधी वृत्तपत्र नंतर टी. व्ही आणि आता ब्लॉग व्दारे सहज स्वातंत्र्यपणे मांडता येऊ लागले. आजच्या दिवसामुळे पत्रकारिता क्षेत्रात एक क्रांतिकारक बदल झाला तो म्हणजे बिनधास्तपणे मत व्यक्त व्यक्त करता येऊ लागले. त्यामुळे आज आपण सुद्धा मुक्तपणे स्वतःचे मत मांडू शकतो.
-ग्रीष्मा शिंदे
भाऊसाहेब हिरे विद्यालय,मुंबई सेंट्रल
लिहायचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच आपण सर्व लोक आपली मतं मोकळेपणाने मांडू शकतो. या स्वातंत्र्यामुळेच मुक्तपणे लिहीण्याची वेगळी ओळख निर्माण होतं आहे.
-सचिन वाघेला
डोंगरी शाळा, डोंगरी
संकल्पना:- रेश्मा आरोटे