*प्रशासन अपयशी*
लोकदर्शन शिवाजी सेलोकर
राज्यात वाढत चाललेल्या कोरोना संक्रमितांची संख्या ज्यात पूर्ण कुटूंब बाधित होत आहेत. अशा स्थितीला शासन-प्रशासन यशस्वी ठरलेले दिसत असतांना या तोडक्या व्यवस्थेवर तथा इच्छाशक्ती नसलेल्यांचे भरोशावर न राहता प्रत्येकाने विशेष करून तरूणांनी आपआपल्या कर्यक्षेत्रात ज्यात गांव असो की शहर सेवा समित्यांचे स्थापन करून गावात वार्डात जेथे सोईचे होईल तेथे गावांतील नागरीकांचे सहकार्याने आवश्यक चादरी, गाद्या, समरंज्या जमा करून वार्ड, गाव तेथे कोरोना केअर सेंटर प्रशासनाचे मदतीशिवाय स्थापन करून गावाचे नागरीक म्हणुन ‘‘माझे गांव, माझे बांधव’’ या भावनेतून समोर यावे. घराघरातून संक्रमितांचे घरातून अथवा अन्य व्यवस्थेने जेवनाचा डब्बाही पूरविला जावू शकतो. प्रशासन सुस्त असतांना ही भूमिका स्विकारून युध्द पातळीवर हे कार्य हातात घ्या. तेव्हाच कुटूंबात सर्वांना बाधा होणार नाही. संक्रमितांना घरातून सेंटरवर ठेवल्याने संख्या वाढणार नाही साखळी तूटेल ती तूम्हीच तोडाल उदासीन प्रशासन तोडू शकत नाही. असे आवाहन सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना हंसराज अहीर यांनी केले.