दि 27/4/2031 ,👉लोकदर्शन
⭕सात हजारवर्षांपूर्वी भारतभूमीवर प्रचंड दुष्काळ पडला होता . रघुवंशी कुलोत्पादन पूर्वी त्याच साखळीतील राजा दुलीपV अधिकारावर होते . प्रचंड ताकद व अत्यन्त शूरवीर असलेला हा राजा दुष्काळाने प्रजेचे हाल हॊत असल्याचे पाहून संतप्त झाला . त्याने मग समुद्र फोडण्याचा निर्णय घेतला होता . पण त्याला ते शक्य झाले नाही . नंतर मात्र त्याच वंशावळीतील भगीरथाने भूतलावर गंगेला वाहते करून दुष्काळ हलका केला . समुद्र आपली मर्यादा सोडत नाही . भूतलावर दुष्काळ पडो व ना पडो तो वाहता होत नाही . त्याला मग मर्यादेत राहण्यासाठी कंट्रोल कोण करतो ? तर उत्तर मिळाले त्याच्या बुडाखालील ज्वालामुखी . समुद्राचे पाणी हळुवारपणे शोषण करीत तो बॅलन्स मेंटेन करतो.ज्ञानोबांनी ज्वालामुखी साठी वाडाग्नी शब्द वापरला . असंख्य नदीनाले सामावून घेत असतांना समुद्र कधीच ओव्हरफ्लो होत नाही . आपल्या पाण्याची मोठया प्रमाणात वाफ झाली तर तो हलकाही होत नाही . समुद्र फुटत का नाही , तो ओव्हरफ्लो का होत नाही या एक ना अनेक प्रशनांची उत्तरे मला सातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरीने दिली . विज्ञानाने या संदर्भात काय कारणे सांगितली मला माहिती नाही पण माउलीने सातशे वर्षांपूर्वी सागराच्या मर्यादेचे कारण स्पस्ट केल्यामुळे मी माय माउली ज्ञानेश्वरीच्या प्रेमातच पडलो . ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाची साक्षात गँगोत्री .बहूजनासाठी माऊलीने ज्ञानाचे आकाशच खुले केले .शब्दांचे अवर्णीय सौदर्य म्हणजे ज्ञानेश्वरी.. जीवनाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी ..भक्तीचा महामार्ग म्हणजे ज्ञानेश्वरी..
© धनराज गावंडे