By : Aakash Chikate, Korpana
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोविड रुग्णाची संख्या दिवसेंदिवस झापाट्याने वाढत आहे .अशातच कोरपणा तालुक्यातील अंतरगाव बु .या गावामध्ये सध्या ताप, सर्दी, खोकलाची साथ सुरू आहे. गावातील प्रत्येक घरचे एक किवा दोन सदस्य ताप, सर्दी, खोकला या आजाराने ग्रासलेले आहे गावात साथीचे रोग सुरू असताना मात्र आरोग्य विभाग झोपेत आहे. मागील दहा ते पंधरा दिवसापासून गावात रोगाची साथ सुरू असून सुद्धा आरोग्य यंत्रणेने गावात कुठलाही सर्वे केलेला नाही.
अंतरगाव येथील आरोग्य सेविका दांडेकर यांना विचारणा केली असता आमच्याकडे पुरेसा मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ वाढेल तेह्वा आह्मी गावात जाऊन सर्वे करु अशी उडवा उडवीचे उत्तरे देण्यात आली.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अंतरगाव बु. हे संपूर्ण गाव सध्या ताप, सर्दी खोकला या आजाराने ग्रासले आहे पण योग्य ती माहिती नसल्याने गावकरी डॉक्टर कडे जायला घाबरत आहे .
आपण जर कोरोना टेस्ट केली तर आपण पॉझिटिव्ह येऊ अशी भीती नागरिकांत आहे
कोरोनाग्रस्त रुग्णाकडे दुर्लक्ष
गावात सध्या दोन कोरोना रुग्ण आढळून आले. एक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दुसरा रुग्ण गावातील विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे.
मागील चार दिवसापासून रुग्ण विलगीकरण कक्षात आहे. मात्र त्या रुग्णाला सुरवातीस गोळ्या दिल्या. त्या नंतर चार दिवस झाले तरी त्या रुग्णाकडे गावातील कोणतीही यंत्रणा फिरून देखील बघत नाही.
मागील चार दिवसापासून कुणीही तब्बेत विचारायला व तपासायला आलेल नाही. ना ऑक्सिजन मीटर ना टेंपरेचर मीटर या गावातील आरोग्य यंत्रणेकडे आहे तरी गावातील आरोग्य यंत्रणेने जातीने लक्ष देण्याची गारज आहे